gulabi sadi fame actress prajakta ghag welcomes baby girl shares good news
संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ गाण्याची अजूनही क्रेझ काही कमी झालेली नाही. अगदी मराठी इंडस्ट्रीपासून बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक सिने तारकांनाही संजू राठोडने या गाण्यावर थिरकायला भाग पाडले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या वरातीत सुद्धा बॉलिवूड सेलिब्रिटींनी ‘गुलाबी साडी’गाण्यावर मनसोक्त ठेका धरला होता. गाण्याची जगभरात चर्चा सुरु असताना सध्या गाण्यातल्या कलाकारांचीही जोरदार चर्चा होताना दिसते. गाण्यामध्ये मुख्य भूमिकेत संजू राठोडसोबत अभिनेत्री प्राजक्ता घाग आहे. सध्या अभिनेत्री प्राजक्ता घाग तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ता घाग हिने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे.
‘गुलाबी साडी’ फेम प्राजक्ता घाग हिने काही तासांपूर्वीच चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. एका चिमुकलीला अभिनेत्रीने जन्म दिलेला आहे. १६ मार्चला म्हणजेच रविवारी प्राजक्ताच्या घरी चिमुकलीचं आगमन झालेलं आहे. तिच्या नवऱ्याने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. प्राजक्ता घागने गेल्या काही दिवसांपूर्वीच बेबी बंपसोबत फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तिने त्या मॅटर्निटी फोटोशूटला लवकरच आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता अभिनेत्रीने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिल्यानंतर तिच्यावर आणि तिच्या पतीवर चाहते कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.
‘कधीतरी तुला पुढचा संकर्षण फोन करेल…’ फोन कॉलवर जितेंद्र जोशीने अभिनेत्याला दिला मोलाचा सल्ला
प्राजक्ताच्या नवऱ्याचं नाव रोहित बोराडे असं आहे. तो पेशाने फिटनेस ट्रेनर आहे. रोहित आणि प्राजक्ता यांनी “वेलकम टू द वर्ल्ड बेबी गर्ल १६ मार्च २०२५” अशी पोस्ट शेअर करत कन्यारत्न झाल्याची आनंदाची बातमी त्यांनी सर्वांना दिली आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ता आणि रोहितवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान,‘गुलाबी साडी’गाण्यात अभिनेत्री प्राजक्ता घाग संजू राठोडसोबत मुख्य भूमिकेत होती. प्राजक्ताने संजू राठोडसोबत ‘नऊवारी पाहिजे’ आणि ‘कसं डिंपल येतय गालावरी’ या गाण्यांमध्येही काम केलं आहे.