Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Movie: डॉ. रामाणींच्या सत्यकथेवर आधारित ‘ताठ कणा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, उमेश कामत साकारणार रामाणींची भूमिका

डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ‘ताठ कणा’ हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 13, 2025 | 04:45 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

कोणत्याही यशस्वी डॉक्टरची ओळख केवळ त्याच्या कौशल्यातून होत नाही तर त्याच्या रूग्णांच्या कथा आणि व्यथांमधून होत असते. कुठल्या तरी आजारापायी जेव्हा एखाद्या रूग्णाचा जीव पणाला लागलेला असतो, तेव्हा त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरचीही प्रत्येक वेळी नव्याने परीक्षा होत असते. त्यात तो पास झाला तरच ‘ताठ कण्यानं’ जगाला सामोरा जाऊ शकतो. अशाच एका ध्येयवेड्या, संशोधनात झोकून दिलेल्या एका डॉक्टरची कथा आहे- ताठ कणा. डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ‘ताठ कणा’ हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘प्रज्ञा क्रिएशन्स’चे विजय मुडशिंगीकर, व ‘स्प्रिंग समर फिल्मसचे करण रावत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले असून दिग्दर्शक गिरीश मोहिते आहेत.

जागतिक ख्यातीप्राप्त आणि आज वयाच्या ८६ व्या वर्षीही दररोज ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरीसाठी सज्ज असलेल्या न्यूरोसर्जन डॉ. पी. एस. रामाणी यांच्या विलक्षण आयुष्याची ही क्षणाक्षणाला वेगळी वळणे घेणारी सत्य कथा.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असूनही डॉक्टर होण्याचा ध्यास त्यांनी घेतला. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्यावर एका मोठ्या आरोपाला सामोरे गेले. त्यातून सुखरुप बाहेर पडल्यावर मोठी नोकरी सोडून देशात परत आले. द्वेष, असूया, अविश्वास यांच्याशी लढत त्यांनी अनेकांच्या पाठीचा कणा ताठ केला. परंतु एक दिवस त्यांच्या संशोधनाची अशी कसोटी लागली की सगळी बोटे त्यांच्याकडे रोखली गेली. त्याचवेळी एका ‘प्रेमा’च्या हाकेने त्यांना दुसरे एक आव्हान स्वीकारण्यास भाग पाडले.

‘क्या दूधिया बदन है…’, अन्नू कपूरने तमन्ना भाटियाला म्हटले ‘मिल्की ब्युटी’, नेटकरी संतापून म्हणाले ‘अश्लील म्हातारा!’

इतरांच्या पाठीच्या कण्यावर उपचार करता करताच स्वतःच्या संशोधनाचा, इतरांच्या त्यांच्यावरील विश्वासाचा आणि पत्नीच्या द्विधा मनस्थितीचा कणा सांभाळत त्यांनी अखेर ऑपरेशन थिएटरमध्ये पाऊल टाकले…पुढे काय झाले त्याची उत्कंठावर्धक कथा म्हणजेच संघर्ष, जिद्द आणि प्रेमाचा ‘ताठ कणा’. उमेश कामत, दीप्ती देवी, सायली संजीव, सुयोग गोऱ्हे,अजित भुरे, शैलेश दातार, अनुपमा ताकमोगे, रवी गोसाई, संजीव जोतांगिया आदी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.

हेमंत ढोमेच्या गावात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा बळी, अभिनेत्याचा संताप, म्हणाला; ”नुसते पिंजरे लावून काही होणार नाही”

चित्रपटाचे छायांकन कृष्णकुमार सोरेन व संकलन निलेश गावंड यांचे आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी महेश कुडाळकर यांनी सांभाळली आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे आहे. प्रशांत पवार कार्यकारी निर्माते आहेत. प्रोडक्शन कंट्रोलर जितेंद्र भोसले आहेत.

Web Title: The film taath kanha will soon hit the screens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Sasare Bapre Marathi Movie : प्रेम, लग्न अन् कौटुंबिक गोंधळ! ‘सासरे बापरे’चा धमाल प्रवास 5 फेब्रुवारीपासून
1

Sasare Bapre Marathi Movie : प्रेम, लग्न अन् कौटुंबिक गोंधळ! ‘सासरे बापरे’चा धमाल प्रवास 5 फेब्रुवारीपासून

Miranda Warning : फार्महाऊसवरील खुनाचं गूढ उलगडणार! आदिनाथ कोठारेच्या ‘मिरांडा वॉर्निंग’चा थरारक टीझर रिलीज
2

Miranda Warning : फार्महाऊसवरील खुनाचं गूढ उलगडणार! आदिनाथ कोठारेच्या ‘मिरांडा वॉर्निंग’चा थरारक टीझर रिलीज

Akshaya Naik: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अक्षयाने सांगितला आयुष्यातील ‘सोनेरी क्षण’; या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार अभिनेत्री
3

Akshaya Naik: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अक्षयाने सांगितला आयुष्यातील ‘सोनेरी क्षण’; या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार अभिनेत्री

Prajakta Mali Gauri Movie: ‘फुलवंती’नंतर प्राजक्ता माळीची नवी निर्मिती; ‘गौरी’तून मांडणार स्त्रीशक्तीचा विचार
4

Prajakta Mali Gauri Movie: ‘फुलवंती’नंतर प्राजक्ता माळीची नवी निर्मिती; ‘गौरी’तून मांडणार स्त्रीशक्तीचा विचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.