सध्या साऊथ चित्रपटांची जगभरात धूम पाहायला मिळत आहे हजारो कोटी रुपयांची हे चित्रपट कमाई करताना दिसत आहेत. बाहुबली पासून नुकताच आलेल्या RRR आणि KGF 2 पर्यंत सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरात सर्वांचे लाडके बनलेले हे साऊथ अभिनेते किती मानधन घेतात तुम्हाला माहितेय का?
RRR मुळे सध्या चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे राम चरण होय. या चित्रपटामुळे हा अभिनेता विदेशातसुद्धा लोकप्रिय बनला आहे. राम चरण एका चित्रपटासाठी 45 कोटी रुपये मानधन घेतो. तसेच रामचरणसोबत RRR मुळे Jr. NTR प्रचंड चर्चेत आहे. यातील त्याच्या अभिनयाचं फारच कौतुक होत आहे. हा अभिनेता एका चित्रपटासाठी 45 कोटी मानधन घेतो.
साउथ सुपरस्टार रजनीकांत हे साऊथमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत सर्वात वर आहेत. ते एका चित्रपटासाठी 100 कोटी रुपये घेतात. इतकंच नव्हे तर ते चित्रपटात होणाऱ्या प्रॉफिटमध्येसुद्धा हिस्सा घेतात.
‘बाहुबली’ मधून अभिनेता प्रभास जगभरात पोहोचला आहे. हा अभिनेता एका चित्रपटासाठी 80 ते 85 कोटी रुपये घेतो. नुकतंच तो ‘राधे श्याम’मध्ये झळकला होता. KGF आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या KGF 2 मुळे साऊथ स्टार यश प्रचंड लोकप्रिय झाला आहे. यश एका चित्रपटासाठी 20 कोटी रुपये घेतो. साऊथमध्ये मास्टर आणि थालापती म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता विजयसुद्धा आपल्या चित्रपटांसाठी मोठं मानधन घेतो. विजय एका चित्रपटासाठी तब्बल 20 कोटी रुपये घेतो.