Maharashtra Breaking News
17 Nov 2025 10:42 AM (IST)
जगातील अनेक मोठं-मोठ्या कंपन्यांनी प्रोडक्टिविटी वाढवण्यासाठी AI चा वापर करण्यास सुरुवात केली आहे. अनेक कंपन्या त्यांची कामं अधिक वेगाने पूर्ण व्हावीत यासाठी AI चा वापर करण्यावर जास्त भर देत आहेत. मात्र आता टेक जायंट कंपनी मेटाने एक अनोखाा नियम जारी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या AI वापरावर त्यांची वेतनवाढ ठरवली जाणार आहे. हा नियम खरं तर हैराण करणार आहे. मात्र AI चा वाढता वापर पाहता, मेटाने घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
17 Nov 2025 10:32 AM (IST)
जर तुमचे बँक खाते निष्क्रिय झाले तर तुम्ही त्या खात्यातून पैसे अथवा ऑनलाइन व्यवहार देखील करू शकणार नाही. यामध्ये प्रामुख्याने सेविंग अकाऊंट, करंट अकाऊंट आणि मुदत ठेवी यांचा समावेश आहे. जर खात्याची मुदत संपली असेल आणि अधिक काळ त्या खात्यातून काहीच व्यवहार झाले नसतील तर बँक संबधित खाते बंद करते. यामुळे खातेदारचे ऑनलाइन बँकिंग, नेट बँकिंग आणि एटीएममधून पैसे काढणे या सुविधा बंद करण्यात येतील. आणीबाणीच्या काळात जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही त्याचा वापर करू शकणार माही.
17 Nov 2025 10:24 AM (IST)
शिवसेनेत फुट पडल्यापासून राज्याच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. अशातच राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये चाकण नगराध्यक्ष निवडणुकीसाठी एकत्र आल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या या युतीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
17 Nov 2025 10:16 AM (IST)
दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आलेल्या शुभमन गिलला शॉट मारल्यानंतर मानेला वेदना जाणवू लागल्या. परिणामी, तो फक्त तीन चेंडूंनंतर निवृत्त झाला. गिल फलंदाजीला परतला नाही आणि त्याला वुडलँड्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे उघड झाले. त्याच्या मानेवर उपचार सुरू होते आणि बीसीसीआयने गिलला इंटर-स्पायनल लिगामेंट दुखापत झाल्याचे अपडेट दिले. आता असे वृत्त आहे की गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी भारतीय कसोटी कर्णधाराला दोन ते तीन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
17 Nov 2025 10:07 AM (IST)
पाकिस्तानच्या (Pakistan) जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्यात आले आहे. रविवारी (१६ नोव्हेंबर) हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी रल्वे ट्रॅकवर बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला. तसेच रॉकेट्सने ट्रेन उडवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यापासून जाफर एक्सप्रेस थोडक्यात बचावली. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. २०२५ मध्ये जाफर एक्सप्रेसवरील हात आठवा हल्ला आहे, यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
17 Nov 2025 09:59 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची कामगिरी सध्या चर्चेत आहे. पोलिसांची एक शंका आणि तोतया अधिकारी अटकेत. केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून फुशारक्या मारत फिरणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या चतुराईने ही अटक झाली आहे. हा सगळा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यात घडला.
17 Nov 2025 09:58 AM (IST)
एसआयआरमधील नियुक्तीबाबतची नाराजी मनात ठेवून एका बीएलओने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने रेल्वेगाडीसमोर उडी मारून जीव दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना बिंदयाका पोलिस स्टेशन हद्दीतील रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू आहे. आत्महत्येची नेमकी कारणे काय याबाबत पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
17 Nov 2025 09:55 AM (IST)
भारताचा अ संघ सध्या एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धा खेळत आहे. टीम इंडियाने आतापर्यत पहिल्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली होती. पण काल झालेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. १६ नोव्हेंबर रोजी एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ मध्ये भारत अ आणि पाकिस्तान अ संघ खेळले. या सामन्यात भारताने खराब कामगिरी केली आणि पाकिस्तानने ८ विकेट्सने विजय मिळवला.
17 Nov 2025 09:50 AM (IST)
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने बिहार निवडणुकीत भरघोस बहुमताने विजय मिळवला. याचा परिणाम शेअर बाजारावर देखील झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. आज, सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, तेजीत उघडण्याची शक्यता आहे. निवडणुकीतील भाजपाच्या विजयाचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,००५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ५४ अंकांनी जास्त होता.
17 Nov 2025 09:45 AM (IST)
दिल्ली:दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अकरावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. तिला जीवे मारण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले. कॅब ड्रॉयव्हरच्या सतर्कतेमुळे यातून १६ वर्षीय मुलीची सुटका झाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
17 Nov 2025 09:40 AM (IST)
17 Nov 2025 09:35 AM (IST)
भारतात 17 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,507 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,464 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,380 रुपये आहे. भारतात 17 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,070 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,800 रुपये आहे. भारतात 17 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 168.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,68,900 रुपये आहे.
17 Nov 2025 09:30 AM (IST)
भारतातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स (TMPV) ने त्यांच्या लोकप्रिय नेक्सॉन SUVमध्ये अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (ADAS) समाविष्ट केल्याची घोषणा केली आहे. आधीच देशातील सेफ्टी क्रांतीचे नेतृत्व करणारी नेक्सॉन ही GNCAP आणि BNCAP दोन्हींकडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी एकमेव SUV ठरली आहे.
17 Nov 2025 09:20 AM (IST)
गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, भ्रष्टाचार, हिंसाचारासाठी शिक्षा न होणे आणि सुरक्षेचा अभाव याविरोधात शनिवारी मेक्सिकोमध्ये तरुणाईचा संताप उसळला. हजारो Gen Z निदर्शकांनी राजधानीत मोठा मोर्चा काढत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. अलीकडेच उरुपानचे महापौर कार्लोस मांझो यांच्या निर्घृण हत्येमुळे नागरिकांचा रोष आणखी चिघळला होता.
१ नोव्हेंबर रोजी मिचोआकान राज्यात एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान महापौर मांझो यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त युवकांनी राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या राष्ट्रीय राजवाड्याकडे मोर्चा वळवला. जमावाने सुरक्षा भिंती तोडत पोलिसांवर दगड, काठ्या, हातोडे, फटाके आणि साखळ्यांनी हल्ले चढवले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.
17 Nov 2025 09:18 AM (IST)
भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात रविवारी झालेल्या आशिया कप रायझिंग स्टार्सच्या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंच्या वर्तणुकीमुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला. सामन्यादरम्यान पाकिस्तानचा फिरकीपटू साद मसूद याने भारतीय उपकर्णधार नमन धीरला बाद केल्यानंतर अतिशय आक्रमक वादग्रस्त सेलिब्रेशन केले. धीरने त्या वेळी 20 चेंडूत 35 धावा ठोकत प्रभावी खेळी केली होती, ज्यात सहा चौकार आणि एक षटकारांचा समावेश होता.
मसूदचे हे उग्र आणि उर्मट सेलिब्रेशन थेट कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. अनेक चाहत्यांनी त्याच्या या कृतीवर टीका करत ते “स्वस्त आणि खेळाच्या भावनेविरुद्ध” असल्याचे सांगितले. सामन्यातील या वादग्रस्त घटनेमुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या शिस्तभंगावरील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
17 Nov 2025 09:15 AM (IST)
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेतून दावरवाडी शाखेकडे २५ लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेने केवळ २४ तासांत अटक केली आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून ३१ लाख ५६ हजार रुपये असा मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शनिवारी पाचोड–पैठण रस्त्यावर दावरवाडी शिवारात ही लूट झाली होती. बँक कर्मचारी रोकड घेऊन जात असताना टोळीने त्याच्यावर हल्ला करून रक्कम हिसकावली होती. प्रकरणी तत्काळ पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
17 Nov 2025 09:12 AM (IST)
शेतकऱ्यांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम देत केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेच्या २१व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातील पुढील २,००० रुपयांचा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी जमा होणार आहे. मात्र, ज्यांनी आपले ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केलेले नाही, अशा शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी तातडीने ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
17 Nov 2025 09:10 AM (IST)
समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून टीकेची झोड उठल्यानंतर मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांनी अखेर माफी मागितली आहे. शनिवारी परमार यांनी एका कार्यक्रमात राजा राममोहन रॉय हे “इंग्रजांचे दलाल” असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर विविध सामाजिक आणि राजकीय वर्तुळांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. वाद चिघळल्यानंतर परमार यांनी व्हिडिओ संदेश जारी केला. त्यात त्यांनी केलेले विधान चुकीचे असल्याची कबुली दिली. “माझ्या तोंडून चुकून असे बोलले गेले. माझा कोणताही गैरअर्थ काढू नये,” असे सांगत त्यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागितली.
17 Nov 2025 09:05 AM (IST)
वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे रविवारी दुपारपासून मुंबईला होणारा सीएनजी वायूचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. या अचानक खंडित झालेल्या पुरवठ्याचा परिणाम सोमवारी सकाळपासून ठळकपणे दिसू लागला असून, शहरातील रिक्षा, टॅक्सी आणि कॅबसेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या आहेत.
काल दुपारनंतर कोणत्याही पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस पोहोचलेला नसल्याने मुंबई, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईतील बहुतेक पेट्रोल पंपांवरील साठा संपला आहे. त्यामुळे पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. सीएनजीअभावी सोमवारी सकाळपासून रस्त्यांवरील रिक्षा व टॅक्सींची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. याचा फटका कामावर आणि शाळेत जाणाऱ्या नागरिकांना बसत असून, अनेकांना रस्त्यावर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
17 Nov 2025 09:00 AM (IST)
एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ ओमानमध्ये होत आहे. भारत देखील या स्पर्धेत सहभागी होत आहे. कसोटी खेळणाऱ्या देशांचे ‘अ’ संघ सहभागी होत आहेत. भारत ‘अ’ संघाने दोन सामने खेळले आहेत, त्यापैकी एकात त्यांना विजय मिळाला आहे, तर पाकिस्तानविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’ संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यात अडचणी येऊ शकतात. सध्या तरी उपांत्य फेरीची परिस्थिती काय आहे? चला जाणून घेऊया.
वाचा सविस्तर-
Marathi Breaking news live updates – भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने बिहार निवडणुकीत भरघोस बहुमताने विजय मिळवला. याचा परिणाम शेअर बाजारावर देखील झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. आज, सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, तेजीत उघडण्याची शक्यता आहे. निवडणुकीतील भाजपाच्या विजयाचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,००५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ५४ अंकांनी जास्त होता.






