Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट? ही लोकप्रिय अभिनेत्री घेणार एक्झिट; हे आहे कारण

Lagnanantar Hoilach Prem Twist: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालीकेत आता एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेतील एका अभिनेत्री आता एक्झिट घेणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. याचे कारण देखील सांगण्यात आलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 26, 2026 | 01:51 PM
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट? ही लोकप्रिय अभिनेत्री घेणार एक्झिट; हे आहे कारण

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट? ही लोकप्रिय अभिनेत्री घेणार एक्झिट; हे आहे कारण

Follow Us
Follow Us:
  • रम्याची भूमिका साकारणारी कश्मिरा कुलकर्णी मालिकेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे.
  • अभिनेत्रीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी सर्जरीचा सल्ला दिला आहे.
  • सध्या शूटिंग मर्यादित हालचालींसह सुरू असून गरज पडल्यास ती काही काळ ब्रेक घेणार आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मध्ये आता एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालीकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री आता एक्झिट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. याचं कारण देखील अभिनेत्रीने स्वत: सांगितलं आहे. मात्र यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही अभिनेत्री कोण आहे आणि मालिकेतून अचानक एक्झिट घेण्याचं कारण काय आहे, याबाबत जाणून घेऊया.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये मोठा ट्विस्ट! 18 वर्षांनंतर बापूजींचा मृत्यू? जेठालालचा आक्रोश, प्रोमोने उडवली खळबळ

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या स्टार प्रवाहावरील मालिकेने अत्यंत कमी कालावधी घराघरात लोकप्रियता मिळवली. या मालिकेला आणि मालिकेतील प्रत्येक कलाकाराला अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांची पसंती मिळाली. जिवा व नंदिनी आणि काव्या आणि पार्थ यांच्या आयुष्यात येणारे नवनवीन ट्विस्ट पाहताना प्रेक्षकांना देखील मजा येत आहे. याशिवाय रम्या आणि विजय यांची नवीन जोडी काव्यार्थ आणि जीवांदिनी यांच्या आयुष्यात कोणते मोठे वादळ आणणार याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री आता एक्झिट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. (फोटो सौजन्य – instagram) 

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या स्टार प्रवाहावरील मालिकेत रम्याचे पात्र साकारून अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी हिने महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रियता मिळवली आहे. कश्मिरा कुलकर्णीने साकारलेल्या रम्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. पार्थला मिळवण्यासाठी रम्याची सुरु असलेली धडपड आणि तिचा रागीट स्वभाव प्रेक्षकांना देखील तितकाच आवडत आहे. जिवा व नंदिनी आणि काव्या आणि पार्थ यांच्या आयुष्यात सतत संकट यावी, यासाठी रम्या नेहमीच नवीन कट रचत असते. तिच्या प्रत्येक कारस्थानाला प्रेकक्षांचा प्रतिसाद उत्तम मिळतो. पण आता असं सांगितलं जात आहे की, रम्या म्हणजेच अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी मालिकेतून एक्झिट घेणार आहे.

अभिनेत्री कश्मिरा हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे डॉक्टरांनी कश्मिराला सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. याच कारणामुळे आता कश्मिरा ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत आता चर्चा देखील सुरु झाली आहे. यावर एका मुलाखतीत कश्मिराने काय सांगितलं जाणून घेऊया.

मंसूर खान आणि आमिरची जोडी पुन्हा ‘लाईमलाईट’मध्ये; ‘कयामत से कयामत तक’च्या आठवणींमध्ये ‘Ek Din’चा ग्रँड प्रीमियर

अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी म्हणाली आहे की, माझ्या पायाला एसिअल कट आहे. डॉक्टरांनी मला सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. या सर्वाबाबत जेव्हा माझ्या टिमला समजलं, सर्वचजण माझी खूप काळजी घेत आहेत. मला केवळ बसून किंवा उभं राहून डायलॉग्स दिले जात आहे, ज्यामुळे मला जास्त हालचाल करावी लागू नये. मी पुन्हा एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे. यानंतर गरज असल्यास मी काही काळ ब्रेक घेईन.

Web Title: This actress is going to take break from lagnanantar hoilach prem marathi serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actress
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Ankita Walawalkar On Pregnancy: ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय…’; मातृत्वाबाबत अंकितानं केलं मन मोकळं
1

Ankita Walawalkar On Pregnancy: ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय…’; मातृत्वाबाबत अंकितानं केलं मन मोकळं

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
2

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक

Prajakta Mali: ‘लग्न करण्याची इच्छा…’; प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली- ‘तुझ्या…’
3

Prajakta Mali: ‘लग्न करण्याची इच्छा…’; प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली- ‘तुझ्या…’

Marathi Actress: गुड न्यूज! ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री झाली आई; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं  खास नाव
4

Marathi Actress: गुड न्यूज! ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री झाली आई; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं खास नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.