सलमान खानच्या (Salman Khan) ‘टायगर 3’ची(Tiger 3) सगळेजण आतुरतेने वाट बघत होते. ‘टायगर 3’चा टीझर आता रिलीज झाला आहे. चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या जयंतीनिमित्त ‘टायगर 3’ चा टीझर लाँच करण्यात आला. ‘टायगर 3’चा हा टीझर (Tiger 3 Teaser) टायगरचा मेसेज असल्याचे बोलले जात आहे. या मेसेजसह चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू होणार आहे. या चित्रपटात बॉलीवूडची डायनॅमिक जोडी कतरिना कैफ आणि सलमान खान पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.
‘टायगर 3’ च्या टीझरने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. टायगरच्या फ्रँचायझीमधील हा थरारक भाग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असताना आज टीझर रिलीज झाला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर 3’ त्याच्या ॲक्शन चित्रपटाची मेजवानी सगळ्यांना अनुभवयाला मिळणार आहे. हा अफलातून थ्रिलर आता मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार असून टायगरच्या या भागात काय वेगळं असणार हे पाहावं लागणार आहे.
‘टायगर 3’चं बजेट 300 कोटी रुपये आहे. यशराज फिल्म्सच्या सर्वात महागड्या चित्रपटापैकी हा एक चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. निर्मात्यांनी ॲक्शन सीक्वेन्स, स्टंट आणि व्हीएफएक्सवर खूप पैसा खर्च केला आहे. ‘टायगर 3’ आधी 21 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार होता, पण आता तो दिवाळीच्या मुहूर्तावर 10 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.