फोटो सौजन्य - X (JioHotstar Reality)
24 Aug 2025 11:40 AM (IST)
बिग बाॅस 19 चा नवा सिझन आता सुरु होणार आहे, हा नवा सिझन सुरु व्हायला काही तास शिल्लक आहेत. यामध्ये काही प्रोमो कलर्सने शेअर केले आहेत यात सलमानचा हटके लूक पाहायला मिळणार आहे. बिग बॉस १९ च्या प्रीमियरमध्ये 'ऐसा पहली बार हुआ हैं' गाण्यावर परफॉर्म करताना सलमान खानचा संपूर्ण काळ्या रंगाचा ब्लेझर आणि पँट घातलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Iss saal phir se hoga entertainment dhamakedaar, @BeingSalmanKhan se milne dil thaam kar ho jaaiye taiyaar!🤩
Dekhiye #BiggBoss19, kal se, raat 9 baje sirf #JioHotstar par aur raat 10:30 baje @ColorsTV par. #BiggBossOnJioHotstar #BB19OnJioHotstar pic.twitter.com/Dus2lZOmwr
— JioHotstar Reality (@HotstarReality) August 23, 2025
24 Aug 2025 10:26 AM (IST)
बिग बाॅस 19 सुरु व्हायला काही तास शिल्लक आहेत, यासाठी सर्वच प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. या सिझनमध्ये फार वेगळी थीम असणार आहे, यावेळी सलमान खानने खुलासा केला की सीझन १९ मध्ये "घरवालों की सरकार" असणार आहे. जो घरातील एका महत्त्वपूर्ण पाॅवर असणार आहे. स्टायलिश नेहरू जॅकेटमध्ये दिसणारा खान शोच्या टीझर व्हिडिओमध्ये एक मोठा ट्विस्ट शेअर करत म्हणाला, "मी खूप दिवसांपासून बिग बॉसचा भाग आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की, बिग बॉस दरवर्षी हा गेम पुन्हा शोधतो आणि इस्स बार, तो घरवालों की सरकार आहे. इतक्या वर्षांनंतर, मी प्रामाणिकपणे म्हणू शकतो की हे सर्व कसे घडते ते पाहण्यासाठी मी तुमच्याइतकाच उत्साहित आहे."
24 Aug 2025 09:55 AM (IST)
बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात मोठा सीझन होणार आहे. यापूर्वी सलमान खानचा हा रिअॅलिटी शो ऑक्टोबर महिन्यात सुरू होत असे आणि जानेवारीत संपत असे. पण यावेळी तो ऑगस्टमध्ये सुरू होत आहे, जो पुढील ५ महिने म्हणजेच जानेवारीपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.
24 Aug 2025 09:25 AM (IST)
बिग बाॅस शोचा १९ वा सीझन सुरू होणार आहे आणि सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे की प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अमाल मलिक या शोचा भाग होणार आहे. शोच्या निर्मात्यांनी नुकताच एक प्रोमो रिलीज केला. यामध्ये एक स्पर्धक स्टेजवर येताना दिसतो आणि पार्श्वभूमीत 'कौन तुझे' हे गाणे वाजते. स्पर्धकाचा चेहरा जाणूनबुजून अस्पष्ट करण्यात आला होता. पण हे गाणे वाजताच चाहत्यांनी लगेच अंदाज लावला की हा आवाज आणि सूर फक्त अमाल मलिकचाच असू शकतो.
24 Aug 2025 09:10 AM (IST)
सोशल मीडियावरचे प्रसिद्ध डान्स स्टार अवेज दरबार आणि नगमा मिराजकर हे दोघेही बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या नावाची चर्चा मागील दोन महिन्यापासून होत होती. हे दोघे आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत.
Pyaar dosti hai, aur aisi hi ek jodi aa rahi Bigg Boss ke ghar mein!
Kya banegi pyaar se sarkaar ya takraar?Dekhiye #BiggBoss19, 24th August se, raat 9 baje sirf #JioHotstar par aur raat 10:30 baje @colorstv par.#BiggBossOnJioHotstar #BB19OnJioHotstar pic.twitter.com/ZpiBgcSVGu
— JioHotstar Reality (@HotstarReality) August 23, 2025
24 Aug 2025 08:56 AM (IST)
आता शहबाज बदेशा की मृदुल तिवारी यांचा एक नवीन प्रोमोसमोर आला आहे आणि यांच्यामध्ये ते दोघेही सलमान खान समोर पाहायला मिळाले. सलमान म्हणतो की तुम्ही दोघे घाबरलेले आहात का? यावर मृदुल तिवारी म्हणतो की मी तर अजिबात घाबरलेलो नाही तर शहबाज बदेशा म्हणतो की मी तर थोडा घाबरलेला आहे. यावर मृदुल तिवारी शेहबाजला म्हणतो की तुझा तर आत्मविश्वास आतापासूनच डगमगला आहे. हा प्रोमो सोशल मिडियावर सध्या फारच व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान खान यांच्या संभाषणावर हसताना देखील दिसत आहे.
24 Aug 2025 08:48 AM (IST)
हा शो रात्री ९ वाजता जिओ हॉटस्टारवर प्रसारित केला जाईल. त्यामुळे टीव्हीच्या आधी तुम्ही जिओ हॉटस्टारवर हा शो पाहू शकता आणि मजा घेऊ शकता. नंतर तो रात्री १०:३० वाजता कलर्स टीव्हीवर प्रसारित करण्यात येणार आहे. तर, प्रीमियर होताच तो पाहू इच्छिणारे सर्व चाहते जिओ हॉटस्टारचा पर्याय निवडू शकतात. कलर्स टीव्हीचा अनुभव आवडणारे प्रेक्षक दररोज कलर्स टीव्हीवर नवीन एपिसोड पाहू शकतात. वाचा सविस्तर
24 Aug 2025 08:35 AM (IST)
23 ऑगस्ट रोजी या शो चा स्पर्धकाचा पहिला प्रोमो समोर आला होता. यामध्ये अभिनेता नाचताना पाहायला मिळाला कमेंट्समध्ये चाहत्यांनी हा गौरव खन्ना आहे असे ओळखले आहे. अनुपमा सिरीयलमधील या अभिनेत्याला प्रेक्षकांकडून फारच अपेक्षा आहेत. मागिल अनेक दिवसांपासून त्याच्या नावाची चर्चा होती.
Audience ka favorite beta is here to rule!
Jhalak mein jab itna mazza, puri picture mein toh lagega tadka 🔥Dekhiye #BiggBoss19, 24th August se, raat 9 baje sirf #JioHotstar par aur raat 10:30 baje @colorstv par.#BiggBossOnJioHotstar #BB19OnJioHotstar pic.twitter.com/lhviURFJHE
— JioHotstar Reality (@HotstarReality) August 23, 2025
24 Aug 2025 08:28 AM (IST)
सलमान खानचा लोकप्रिय शो बिग बॉस 19 ला सुरू व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. हा शो टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक हे कलर्स टीव्हीवर पाहू शकतात तर या शोची लाईव्ह स्ट्रीमिंग ही जिओहॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.
टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस आज पुन्हा एकदा नव्या सीजन सह सुरु होणार आहे. सलमान खान आज पुन्हा एकदा त्याच्या प्रसिद्ध शोमध्ये पाहायला मिळणार आहे. अनेक स्पर्धकांची नावे ही रिव्हिल झाले आहेत. बिग बॉस 18 चा विजेता करणवीर मेहरा झाल्यानंतर कोणताही बिग बॉसचा ओटीटी सीजन आला नाही त्यामुळे प्रेक्षकांना बिग बॉस 19 ची प्रतीक्षा लागली आहे. आज बिग बॉसच्या या नव्या सीजन संदर्भात सविस्तर डिटेल्स तुम्हाला नवराष्ट्र डिजिटलवर पाहायला मिळणार आहेत.