Video : स्मॉल स्क्रीनवरील ‘तू चाल पुढं’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे. मालिकेत सध्या सुरू असलेल्या ट्रॅकमुळे मालिकेला प्रेक्षकांची पावती मिळत आहे. विशेषत: महिलावर्गामध्ये ही मालिका अधिक लोकप्रिय झालेली आहे. मालिकेत अश्विनी सारख्या एका सामान्य गृहिणीची कथा दाखवण्यात आली आहे. नवऱ्याचा विरोध पत्करून, सासूची मनधरणी करून अश्विनी हळूहळू स्वतःचे अस्तित्व सिद्ध करताना दिसत आहे. यावेळी तिला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घराला मदत म्हणून अश्विनी पार्लरचा व्यवसाय सुरू करते. पार्लरला मदत म्हणून ती सौंदर्य स्पर्धेतही भाग घेते. मिसेस इंडिया स्पर्धेत अश्विनीने घेतलेला भाग तिच्या घरच्यांना पसंत नसतो. ह्या गोष्टीला नवऱ्याचा आणि सासूचा विरोध असतानाही ती धाडसाचा निर्णय घेते. मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत आल्यानंतर तिची नणंद देखील तिच्या या प्रवासात वारंवार अडचणी निर्माण करताना दिसते.
[read_also content=”का चढला अनिरुद्धचा पारा? ईशा-अनिशच्या नात्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यावर परिणाम? https://www.navarashtra.com/movies/aai-kuthe-kay-karate-new-twist-aniruddha-isha-anish-love-story-380325.html”]
हळूहळू मजल दरमजल करत, साऱ्या अडचणींचा सामना करत आता अश्विनी स्पर्धेच्या फायनलमध्ये आलेली आहे. परीक्षकांनी विचारलेल्या फेमिनिझम म्हणजे काय? या प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तराने परीक्षकही भारवले जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे. अश्विनीनी दिलेल्या उत्तरातून महिला वर्गाने शिकण्याची गरज आहे. मालिकेतील या सीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अश्विनीच्या या उत्तराचे कौतुक होताना दिसत आहे.
स्त्रील पुढे जाण्यासाठी तिच्या घरच्यांची साथ मिळणं अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं असतं. मात्र, अशावेळी जर का महिलाच दुसऱ्या महिलेचे पाऊल मागे खेचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा फेमिनिझम म्हणजे काय हे जाणवतं.
महिलेने महिलेला विरोध करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अश्विनी इथे उदाहऱण देताना म्हणते की, “सुरुवातील माझ्या सासूनेदेखील अशा गोष्टीत सहभाग दर्शवण्यावर आक्षेप घेतला होता. सोसायटीच्या एका कार्यक्रमात मला सहभागी होण्यास त्यांनी विरोध केला होता. मात्र, आज त्या माझ्या बाजूने उभ्या आहेत, हा आहे खरा फेमिनिझमचा अर्थ. जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहते तोच खरा फेमिनिझम”. अशा प्रकारे अश्विनी फेमिनिझमचा अर्थ सांगते.
एवढंच नाही तर पुढे जाऊन अश्विनी म्हणते की, ” त्यांना माहित आहे अशा साडीवर कुंकू लावत नाहीत, मात्र, तरीही या साडीवर शोभेल अशी नाजूक टिकली त्यांनी माझ्यासाठी शोधून आणली.
मला परीक्षकांना फेमिनिजम म्हणजे काय याचे हे उदाहरण द्यायचे आहे. हेच आहे खरे फेमिनिझमचे उदाहरण असं अश्विनी म्हणते.” अश्विनीच्या या उत्तरानंतर महिला प्रेक्षकांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. या मुद्द्यावर महिला वर्ग आता भरभरून बोलताना दिसत आहेत. “स्त्रीयांना घरातून पाठिंबा मिळत नाही म्हणूनच त्या मागे राहतात, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. नवरा, सासू सासरे यांच्याकडून विरोध होत असल्याने त्या पुढे येऊ शकत नाहीत. ही विचारसरणी बदलणं गरजेचं असल्याचंच मालिकेतूनही मांडण्यात आलेलं आहे. मालिकेतही सासू सुनेची बाजू मांडताना, तिच्या बाजूने भक्कमपणे उभी राहताना पाहायला मिळत आहे. हे बदल घडून आले तरच सुखी संसाराची समीकरणे जुळून येऊ शकतात.” अश्विनीच्या या उत्तराने सर्वांचे मन जिंकले आहे. तिच्या या व्हिडिओवर प्रेक्षकांनी देखील कमेंटचा वर्षाव केला आहे.
अनेक महिला आजही गृहिणी आहेत. तर काही महिला घर, ऑफिस किंवा आपला उद्योग तारेवरची कसरत करत सांभाळताना दिसत आहेत.अशाच कथेवर आधारित ही एका गृहिणीची आणि गृहिणी असूनही यशस्वी उद्योजिकेचा प्रवास करणारी कहाणी आहे. आता अश्विनीच्या या उत्तराने परीक्षक भारावले जातील यात शंकाच नाही.
मात्र, ट्विस्ट नसेल तर ती मालिका कसली या समीकरणानुसार आताही शिल्पी काही उचापती करणार का? की अश्विनीच मिसेस इंडियाचा मुकूट जिंकणार हे पाहुया.