अभिनेत्री तुनिषा शर्मानं २४ डिसेंबरच्या रात्री टीव्ही शो ‘अली बाबा- दास्तान ए काबूल’च्या सेटवर आत्महत्या केली. तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता शिझान खान याला या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. शिझान तुनिषावर धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकत होता, असा आरोपही तुनिषाच्या आईनं केलाय. तर दुसरीकडं शिझानच्या कुटुंबियांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तुनिषाच्या २१ व्या वाढविसाच्या निमित्तानं तिच्या आईनं माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तुनिषा नेमकी किती प्रॉपर्टी आईसाठी सोडून गेली, हा प्रश्नही तिला विचारण्यात आला.
[read_also content=”उच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर बास्केटबॉल असोसिएशनची माघार, जिल्हास्तरीय बास्केटबॉलपटूंना मिनी ऑलिम्पिकसाठी परवानगी https://www.navarashtra.com/maharashtra/high-court-decision-about-players-involvement-in-mini-olympic-nrsr-359247.html”]
मुंबई सोडून देणार, तुनिषाच्या आईनं काय सांगतिलं?
आपल्या मुलीच्या दु:खातून अद्याप बाहेर आलेले नाही, असं तुनिषाच्या आईनं माध्यमांना सांगितलंय. मुलीसाठी मुंबई शहरात राहत होते, आता लवकरच मुंबई सोडणार असल्याचंही तिच्या आईनं सांगितलंय. तुनिषा आता जिंवत नाही मात्र तिच्या २१ व्या वाढदिवशी तिला सरप्राईज देण्याचा प्लॅन असल्याचंही वनिता शर्मा यांनी म्हटलंय. त्यासाठी थीम केक आणण्याचा आणि जवळच्या मित्रांना पार्टीसाठी बोलावणार असल्याचं प्लॅनिंग केलं होतं, असंही अतीव दु:खात त्यांनी सांगितलंय. आता मुलगी जिवंत नसली तरी तिच्या स्मृतीसाठी केक कापणार असल्याचंही वनिता शर्मांनी सांगितलंय.
तुनिषाची किती प्रॉपर्टी ?
तुनिषाने आईसाठी खूप मोठी प्रॉपर्टी सोडल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. तुनिषाला मोठ्या आणि अलिशान वस्तूंचा छंद असल्याचं त्यांनी म्हटलंय. तिला खरेदी करायला आवडायचं आणि ती महाग वस्तू खरेदी करीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तिच्या १८ व्या वाढदिवशी तुनिषासाठी हिऱ्याची अंगठी घेतली होती, याची आठवणही त्यांनी शेअर केली. तिच्याकडे मोठी कार होती, खरंतर लहान कारही चालली असती, मात्र तिला अजूनही एक ऑडी घ्यायची होती, असंही वनिता यांनी सांगितलंय.
भाड्याच्या घरात राहतोय
तुनिषाने त्यांच्यातील वादांमुळे घर सोडल्याच्या आरोपांचाही वनिता शर्मांनी इन्कार केला. एका भाड्याच्या घरात राहत असल्याचं त्यांनी सांगितलंय. दोघींनी मिळून पुढच्या वर्षी घर घेण्याचं प्लॅनिंग केलं होतं. असंही त्यांनी सांगतिलं आहे. कार असो वा तुनिषाचा लॅपटॉप हे सगळं इएमआयवर खरेदी केलं होतं. असं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर खचली होती तुनिषा
लहानपणापासून तुनिषाच्या मागे सावलीसारखी असल्याचं वनिता यांनी सांगितलं आहे. जेव्हा तुनिषा १८ वर्षांची झाली, तेव्हापासून तिला सेटवर एकटीला जाण्याची परवानगी दिली होती. तिनं स्वतंत्र जगावं अशी इच्छा होती. आपलं काही बरं वाईट झालं तर तुनिषा कशी जगेल अशी चिंता भेडसावत असल्याचंही वनिता शर्मा यांनी म्हटलंय. तुनिषा तिच्या वडिलांच्या जवळ होती. ते गेल्यावर तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. रात्री झोपेतही ती वडिलांना चाचपडत असे अशी माहितीही त्यांनी दिली आहे.