Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वय केवळ आकडा! ‘गाडी नंबर १७६०’मध्ये सुहास जोशींनी साकारले ॲक्शन सीन्स

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे त्यांनी या चित्रपटात पहिल्यांदाच काही ॲक्शन सीन्सही स्वतः साकारले आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 25, 2025 | 06:59 PM
वय केवळ आकडा! ‘गाडी नंबर १७६०’मध्ये सुहास जोशींनी साकारले ॲक्शन सीन्स

वय केवळ आकडा! ‘गाडी नंबर १७६०’मध्ये सुहास जोशींनी साकारले ॲक्शन सीन्स

Follow Us
Follow Us:

तन्वी फिल्म्स प्रस्तुत ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यातील रहस्य, ट्विस्ट्स आणि टर्न्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरमध्ये वेधक दृश्यांबरोबरच एक खास गोष्ट लक्ष वेधून घेते, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचे ॲक्शन सीन्स. ७७ वर्षीय सुहास जोशी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून विशेष म्हणजे काही ॲक्शन सीन्स त्यांनी स्वतः साकारले आहेत.

इंदू-अधूच्या संसारात नवं संकट? गोपाळच्या परत येण्याने ‘इंद्रायणी’ मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट

भूमिकेविषयी ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी सांगितले की, “वय कितीही असो, जेव्हा भूमिका मनापासून आवडते, तेव्हा तिच्यात पूर्णपणे झोकून देणं गरजेचं वाटतं. ‘गाडी नंबर १७६०’ मधील माझी भूमिका वेगळी आहे आणि त्यासाठी ॲक्शन सीन करणे हा एक नवीन आणि उत्साही अनुभव होता. मनातली जिद्द आणि अभिनयावरील प्रेम हेच मला पुन्हा कॅमेऱ्यासमोर घेऊन येतं. टीमचा पाठिंबा आणि वातावरण इतकं सकारात्मक होतं की, ॲक्शन सीन करायला भीतीच वाटली नाही.”

“माझी बायको प्रेग्नेंट अन् मी…” प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने मायदेशी परतल्यावर सोडला सुटकेचा निश्वास

दिग्दर्शक म्हणतात, “सुहास मॅडम म्हणजे एक प्रेरणा आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता आम्ही बॉडी डबल वापरण्याचा पर्याय ठेवला होता. पण त्यांनी तो साफ नाकारला. ‘मी स्वतः अ‍ॅक्शन सीन करणार.’ त्यांच्या आवाजात इतका आत्मविश्वास होता की आम्हाला काही क्षण अवाक व्हायला झालं. या वयातही त्यांची ऊर्जा, मेहनतीची तयारी आणि कामाबद्दलचा आदर पाहून आम्हा सर्वांना एक नवीच प्रेरणा मिळाली. खरंच, त्या आमच्यासाठी केवळ एक अभिनेत्री नाहीत, तर एक आदर्श आहेत.”

मॅनेजरनंतर आता ‘सरदारजी ३’ वादावर स्वतः दिलजीतने सोडले मौन, म्हणाला ‘चित्रपटात खूप तर आहे, पण …’

या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी असून, लेखन व दिग्दर्शनाची धुरा योगिराज संजय गायकवाड यांनी सांभाळली आहे. प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या ४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुहास जोशींच्या अशा समर्पणातून त्यांची अभिनयावरील निष्ठा अधोरेखित होते आणि नव्या पिढीसमोरही एक प्रेरणादायी उदाहरण ठरते. आता चित्रपटात त्यांची नेमकी भूमिका काय असेल, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Veteran actress suhas joshi gadi number 1760 marathi movie play in action scenes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 06:59 PM

Topics:  

  • marathi actress
  • Marathi Film Industry
  • marathi movie

संबंधित बातम्या

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
1

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
2

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार
3

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!
4

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.