"माझी बायको प्रेग्नेंट अन् मी..." प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने मायदेशी परतल्यावर सोडला सुटकेचा निश्वास
‘जाट’, ‘छावा’, ‘रंगबाज’ आणि ‘गुंजन सक्सेना’ यांसारख्या अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून अभिनेता विनित कुमार सिंगने चाहत्यांच्या मनामध्ये घर केले. अभिनेता विनित कुमार सिंगने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटामध्ये कवी कलश यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा अभिनेता सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
मॅनेजरनंतर आता ‘सरदारजी ३’ वादावर स्वतः दिलजीतने सोडले मौन, म्हणाला ‘चित्रपटात खूप तर आहे, पण …’
गेल्या काही दिवसांपूर्वीच विनित कुमार सिंग आणि त्याची पत्नी रुचिराने ‘गुड न्यूज’ दिली होती. ते दोघेही लवकरच आई- बाबा होणार आहेत. विनीत नुकताच काही कामानिमित्त दुबईला गेला होता. यावेळी त्याने विमानाने प्रवास करतानाचा अनुभव इन्स्टा स्टोरी आणि मुलाखतीच्या माध्यमातून सांगितला आहे. या दरम्यान त्याचा प्रवास खूप तणावपूर्ण असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये विनित म्हणतो की, “मी सध्या दुबई विमानतळावर असून फ्लाईटची वाट बघत आहे. सुदैवाने सगळं सुरळीत होईल” असं म्हटलं होतं. यानंतर तो मायदेशी परतला.
भारतात आल्यानंतर त्याने पुन्हा सोशल मीडियामार्फत तो सुखरुप परतला असल्याचं सांगितलं. ‘हिंदुस्थान टाईम्स’सोबत साधलेल्या संवादामध्ये विनीतने सांगितलं की, “मी दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचत असताना मला अचानक फोन आणि मेसेजेस यायला सुरुवात झाले. चौकशी केल्यानंतर मला कळलं की, यूएईची विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ९:४० च्या फ्लाईटला उशीर झाला आणि तेव्हा मला समजलं होतं की काहीतरी सुरू आहे. पण, तेथील स्टाफने आम्हा सर्वांशी नीट संपर्क साधत परिस्थिती व्यवस्थित हाताळली आणि नंतर आम्ही १०:४५ ची फ्लाईट पकडली.”
करोडो रुपयांची मालकीण आहे करिश्मा कपूर; ‘या’ ७ पद्धतीने कमावते पैसा…
विनीत पुढे म्हणाला, “माझी बायको प्रेग्नेंट आहे, त्यामुळे घरूनही फोन सुरू होते. कारण त्यांना काळजी वाटत होती आणि तेव्हा विमानतळावर युद्धाबद्दल चर्चा सुरू झालेल्या. आपण ज्या बातम्या बघतो त्या खऱ्या असतीलंच असं नाही. मी अशा परिस्थितीत नेहमीच शांत राहणं योग्य समजतो आणि जेव्हा मी भारतात परतलो, तेव्हा मला पाहताच माझं संपूर्ण कुटुंब आनंदी होतं.” विनीत कुमार सिंह नुकताच दुबईला गेला होता. यावेळी मिडल ईस्टमध्ये विमान सेवा बंद करण्याची घोषणा झाली होती. परंतु, नंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तो सुखरुप भारतात परतला. याबाबत त्याने सोशल मीडियावरून सांगितलं होतं.