साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. विजय देवरकोंडा करण जोहरच्या कॉफी विथ करण 7 मध्ये अनन्या पांडेसोबत दिसला होता. या शोमध्ये त्याने त्याचे वैयक्तिक आयुष्य, प्रेम आणि लैंगिक जीवनाबद्दल बरेच काही सांगितले आहे. विजय देवरकोंडा आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांच्यातील नातं गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. आता करण जोहरच्या चॅट शोमध्ये विजयने रश्मिकासोबतच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
‘कॉफी विथ करण 7’ मध्ये करण जोहरने विजय देवरकोंडाला त्याच्या लव्ह लाईफ आणि कथित गर्लफ्रेंड रश्मिका मंदान्नाविषयी विचारले. विजय देवरकोंडा म्हणाला, ‘मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला दोन चित्रपटांमध्ये रश्मिकासोबत काम केले आहे. ती खूप छान आहे आणि माझे तिच्यावर प्रेम आहे. माझ्यासाठी ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. चित्रपटात काम करताना अनेक गोष्टींची देवाणघेवाण होते. त्यावेळी दोघांमध्ये एक खास नाते निर्माण झाले होते.
करण जोहरने विजय देवरकोंडाला विचारले, ‘तुझे नाते गुंतागुंतीचे आहे की तू अविवाहित आहेस?’, तो हसला आणि म्हणाला, ‘एक दिवस माझे लग्न होणार आहे. मला मुले होतील. त्यावेळी मी अभिमानाने एक गोष्ट सांगेन की, मी कोणावर प्रेम करतो. मात्र तोपर्यंत मी कोणाच्याही भावना दुखावणार नाही. माझे अनेक चाहते आहेत. मला सध्या सगळ्यांच्या भावना दुखावायच्या नाहीत. त्यामुळे मी आता काही बोलणार नाही.