'देशात काय चाललंय आणि याचं काय चाललंय ?' राहुल वैद्यवर विराट कोहलीचा भाऊ संतापला; पोस्ट Viral
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गायक राहुल वैद्य (Singer Rahul Vaidya) आणि क्रिकेटपटू विराट कोहलीचा (Cricketer Virat kohli) कमालीचे चर्चेत आहेत. कारण ठरलंय, दोघांतील आपआपसातील वाद… क्रिकेटरच्या आणि गायकाच्या वादात चाहत्यांनीही आता उडी घेतलीये. विराटने आपल्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचा दावा स्वत: राहुलने केला. गायकाने विराट आणि त्याच्या चाहत्यांना ‘जोकर’ म्हटलं होतं. आता विराटचा भाऊ विकास कोहली याने राहुल वैद्यला चांगलंच सुनावलं आहे.
बिग बॉस मराठीच्या विजेत्याला लागली हळद, अभिनेत्याच्या मित्रांनी केली धमाल; Video Viral
दोन्हीही सेलिब्रिटींच्या ऑनलाईन वादावर आता त्यांच्या घरातल्या मंडळींनीही प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. विराट कोहलीने अवनीत कौरच्या फॅनपेजने शेअर केलेल्या एका पोस्टला लाईक केली होती. इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदममुळे पोस्टवर लाईक दिसत असल्याचं मत, विराटने स्पष्टीकरण दिलं होतं. याच आधारावर राहुलने विराटवर टीका केली होती. राहुलने विराटच्या चाहत्यांना ट्रोल करणाऱ्या अनेक पोस्टही केल्या होत्या. काही वर्षांपूर्वी विराटने इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचंही म्हटलं होतं. आता विकास कोहलीने सोशल मीडियावर राहुलच्या टीकेला उत्तर दिलंय. त्याची चांगलीच कानउघडणी केलीये.
‘Fifty Shades Darker’ दिग्दर्शकाचे निधन, ‘या’ गंभीर आजाराने वयाच्या ७१ व्या वर्षी गमावला जीव!
विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने थ्रेडवर (Thread) पोस्ट शेअर करत लिहिले की, “बाळा, इतकी मेहनत जर तू गाण्यात घेतली असतीस तर स्वकष्टावर प्रसिद्ध झाला असतास. सध्या संपूर्ण देश कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, त्यावर लक्ष दे. तर इकडे विराटच्या नावाचा वापर करुन हा बावळट फॉलोअर्स वाढवण्याच्या आणि प्रसिद्ध होण्याच्या मिशनवर आहे. किती मोठा लूजर आहे.” विकास कोहलीची ही थ्रेड पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विराटचे चाहते ती पोस्ट शेअर करत असून विकासने राहुलला दिलेलं उत्तर अगदी बरोबर असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिलीये.
जम्मूमधील हल्ला पाहून घाबरले बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी; रात्रभर जागून केले ट्विट, दिला खास संदेश!
राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर विराट आणि त्याच्या चाहत्यांना जोकर म्हटले होते. त्यानंतर राहुलने लिहिले होते- ‘तुम्ही मला शिवीगाळ करत आहेत, हे चांगले आहे. परंतु तुम्ही माझ्या बहिणीवर, माझ्या पत्नीवरही शिवीगाळ करत आहात, ज्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, ते योग्य नाही. म्हणूनच मी म्हणतोय की, विराट कोहलीचे चाहते विनोदी आहेत.’ असं म्हणत शेवटी राहुल विराटला ‘२ कौडी के जोकर’ सुद्धा म्हणाला. राहुलने त्याच्या स्टोरीत सांगितले होते की, विराट कोहलीने त्याला ब्लॉक केले आहे.