Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ती’च्या आत्मसन्मानाची कथा सांगणाऱ्या “वामा- लढाई सन्मानाची” चित्रपटाला दमदार प्रतिसाद

"वामा-लढाई सन्मानाची" अश्याच एका स्त्रीची कथा आहे जिथे सरला नावाची मुलगी तिचे शिक्षण पूर्ण करता येईल ह्या हमी  वर लग्न करते पण प्रत्यक्षात तसे घडत नाही.

  • By चेतन बोडके
Updated On: May 26, 2025 | 04:58 PM
'ती'च्या आत्मसन्मानाची कथा सांगणाऱ्या "वामा- लढाई सन्मानाची" चित्रपटाला दमदार प्रतिसाद

'ती'च्या आत्मसन्मानाची कथा सांगणाऱ्या "वामा- लढाई सन्मानाची" चित्रपटाला दमदार प्रतिसाद

Follow Us
Close
Follow Us:

आपला समाज आजही पुरुषप्रधान समाज आहे. आपण स्त्री-पुरुष समानते विषयी बोलतो पण प्रत्यक्षात तसे वागत नाही. एक स्त्री, मग ती आपली आई, बहीण किंवा बायको असो, आपण तिला योग्य मान देण्यात कमी पडतो. स्त्रिया हा त्रास सहन करतात, पुरुषांना समजून घेतात आणि त्यांचा अपमान होणार नाही अश्या पद्धतीने वागतात….. पण ह्या बदल्यात त्यांना काय मिळतं …. ? कोणी एकीने आवाज उठवला तर समाजाच्या नजरा तिच्याकडे वक्र होतात. बरेच वेळा अशी परिस्थिती उद्भवते कि स्त्री ला स्त्रीच साथ देत नाही. अश्या परिस्थितीत घुसमट सहन करण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नसतो.

‘बिग बॉस ११’ फेम अभिनेत्रीच्या घरातून लाखोंचा ऐवज लंपास, बहिणीच्या लग्नासाठी आणलेले दागिने आणि पैसे घेऊन चोरांनी ठोकली धूम

“वामा-लढाई सन्मानाची” अश्याच एका स्त्रीची कथा आहे जिथे सरला नावाची मुलगी तिचे शिक्षण पूर्ण करता येईल ह्या हमी  वर लग्न करते पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. तिचे शिक्षण तर बंद होतेच पण नवऱ्याच्या पुरुषी अहंकारापायी तिने रंगवलेली सुखी संसाराची स्वप्ने धुळीस मिळतात. घरी सासू आणि नणंद असते पण सरला ला त्यांची साथ अजिबात लाभत नाही कारण त्या हि मूग गिळून गप्प राहत असतात.

सरला रोज होणारा अत्याचार आणि अपमान सहन करते, का त्याच्या विरुद्ध आवाज उठवते आणि यशस्वी होते का तोंडघशी पडते….. हे बघण्यासाठी “वामा- लढाई सन्मानाची”  हा चित्रपट बघायला हवा जो २३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्र, गोवा आणि इंदोर येथे प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. एक विचार करायला लावणारा आणि सोबत मनोरंजन हि देणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला त्यासाठी समस्त प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद.

प्रीती झिंटाचं दिलदार मन, सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलींसाठी दान केले ‘इतके’ कोटी

आपल्या उदंड प्रतिसादामुळे “वामा-लढाई सन्मानाची” हा चित्रपट दिमाखात दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करीत आहे. मराठवाड्यात हा चित्रपट “सुपरहिट” ठरला असून इतरत्र हि त्याच्या बद्दल सकारात्मक चर्चा होत  आहे. सध्या गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाबद्दल ऐकून दुःख आणि चीड निर्माण होते आहे. “वामा” अश्या विषयांना वाचा फोडणारा आणि समाजाचे डोळे उघडणारा चित्रपट आहे.

चित्रपटात डॉ. महेशकुमार, गणेश दिवेकर, जुई बी, संजीवनी पाटील हे कलावंत आहेत तर सरला च्या मुख्य भूमिकेत कश्मिरा कुलकर्णी हि गुणी अभिनेत्री आहे. तरुणांच्या “दिल की धडकन” असणाऱ्या गौतमी पाटील चे ह्या चित्रपटातील “फायर ब्रिगेड ला बोलवा” हे गीत प्रेक्षकांनी उचलून धरलेलेच आहे.

बाबो… ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत लैंगिक संबंध; ॲडल्ट स्टारला गाठावं लागलं हॉस्पिटल

सुब्रह्मण्यम के. हे ह्या चित्रपटाचे निर्माते असून अशोक कोंडके ह्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तरंग वैद्य ह्यांनी ह्या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. त्यांनी एक गीत ही लिहिले असून इतर गाणी मंदार चोळकर ह्यांनी लिहिली आहेत. कैलाश खेर ह्यांच्या दमदार आवाजातील शीर्षक गीत प्रेरणादायी आहे. तर वैशाली सामंत आणि कविता राम ह्यांची गाणी लोकप्रिय ठरत आहेत. चित्रपटाचे कर्णमधुर संगीत ह्रिजु रॉय ह्यांचे आहे.

अशोक कोंडके ह्यांच्या मते त्यांनी समाजात घडणाऱ्या ज्वलंत विषयाला वाचा फोडली आहे आणि त्यांचा विश्वास आहे कि समाज मग तो पुरुष असो वा स्त्री, सगळे कथे सोबत “रिलेट” करतील, त्यामुळे तुम्ही जर हा चित्रपट अजून बघितला नसेल तर आत्ताच तिकीट बुक करा आणि  आपल्या मित्र परिवारसह आवर्जून बघा.

Web Title: Wama ladhai sanmanachi marathi movie released on theater

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • marathi film
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
1

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी
2

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
3

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज
4

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.