प्रीती झिंटाचं दिलदार मन, सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलींसाठी दान केले 'इतके' कोटी
सध्या ‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटा आयपीएल २०२५ मुळे चर्चेत आहे. अमेरिकेमध्ये स्थित असलेली प्रीती झिंटा सध्या भारतामध्ये आली आहे. पंजाब किंग या क्रिकेट टीमची मालकिण असलेली प्रीती आयपीएलमुळे भारतातच सध्या स्थित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दुर असलेली प्रीती तिच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे चर्चेत आली आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांमध्ये चर्चेत राहणाऱ्या प्रीतीने भारतीय सैनिकांच्या विधवा पत्नी आणि त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी अभिनेत्रीने कोट्यवधींची देणगी दिली आहे.
बाबो… ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत लैंगिक संबंध; ॲडल्ट स्टारला गाठावं लागलं हॉस्पिटल
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने आजवर आपल्या सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आजवर अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रीतीने चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले आहे. बॉलीवूड विश्वापासून दूर असलेल्या प्रीतीने भारतीय सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारतीय सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलांच्या भविष्यातील कल्याणासाठी अभिनेत्रीने आर्थिक मदत म्हणून १.१० कोटींची देणगी दिली आहे. प्रीतीने ही देणगी दक्षिण-पश्चिम कमांडच्या ‘आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन’ला (Army Women’s Welfare Association- AWWA) दिली आहे.
अभिनेत्रीने AWWA ला ही देणगी आयपीएल संघ पंजाब किंग्जच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत देण्यात आली आहे. शनिवारी (२४ मे) जयपूरमध्ये झालेल्या एका विशेष कार्यक्रमात प्रिती झिंटाने ही देणगी दिली. शनिवारी (२४ मे) जयपूरमध्ये आर्मीसंबंधित झालेल्या एका कार्यक्रमामध्ये प्रीती झंटाने उपस्थिती दर्शवली होती. यावेळी लष्करातील उच्च पदस्थ अधिकारी देखील उपस्थित होते. याशिवाय जवानांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
जवानांसोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत बोलत असताना प्रीती म्हणाली की, “सैनिकांच्या कुटुंबांना मदत करणे केवळ सन्मानाची नाही तर जबाबदारीची गोष्ट आहे. आपल्या जवानांनी दिलेल्या बलिदानाची आपण केव्हाही परतफेड करू शकत नाही. किमान आपण त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहणेच महत्वाचे आहे. त्यांना पुढे जाण्यास मदत करू शकतो. आम्ही भारतीय सैन्याच्या शौर्यावर अत्यंत अभिमान बाळगतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाचा जन्म सैनिकी कुटुंबात झाला आहे. तिचे वडील दुर्गानंद झिंटा भारतीय सैन्यात मेजर होते. अभिनेत्रीने, सैनिकांच्या घरातील कुटुंबियांचा संघर्ष आणि त्याग खूप जवळून पाहिला आहे. त्यामुळे तिला देशाच्या सैन्याप्रती विशेष प्रेम आहे. याच प्रेमापोटी डिंपल गर्लने सैनिकांच्या कुटुंबियांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली. प्रीती झिंटाने केलेली मदत केवळ कौतुकास्पदच नाही, तर प्रेरणादायी आहे.
गेल्या अनेक वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीपासून दुर राहिलेली प्रीती झिंटा पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीमध्ये परतणार आहे. अनेक वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘लाहेर १९४७’ या चित्रपटातून प्रीती गर्ल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. आमिर खानची निर्मिती असलेला हा चित्रपट भारत- पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.