Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' म्हणून हाक का मारतात? जाणून घ्या
अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन सीरियल्समध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेते अशोक सराफ यांनी चाहत्यांचं निखळ मनोरंजन केलं आहे. अभिनयसम्राट अशोक सराफ यांना २०२३ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने तर नुकतंच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकाराकडून देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित नागरी पुरस्कार म्हणून समजला जाणाऱ्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. गेल्या पाच दशकांपासून अशोक मामांनी मराठी सोबतच हिंदी प्रेक्षकांचेही निखळ मनोरंजन केले. या काळात त्यांनी ३००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशा बहुआयामी अशोक मामांचा आज ७८वा वाढदिवस आहे.
हसा हसा आणि फक्त हसा! अशोक मामांचे सुपरहिट चित्रपट चाहत्यांना OTT वर पाहता येणार; वाचा यादी
‘अशी ही बनवाबनवी’, ‘माझा पती करोडपती’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘एक उनाड दिवस’ अशा चित्रपटातून दमदार हिट चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेते अशोक सराफ यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही. आज अशोक मामांच्या वाढदिवसानिमित्त कलाकारांसह त्यांचा लाखोंचा चाहतावर्ग त्यांना ‘अशोक मामा’ म्हणूनच हाक मारतो. पण त्यांना मामा म्हणून का हाक मारली जाते ? हे तुम्हाला माहितीये का ? जाणून घेऊया आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त…
खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग; मनोरंजन आणि मस्तीचा चाहत्यांना मिळणार जबरदस्त पॅकेज
अभिनेते अशोक सराफ यांनी ८० ते ९० च्या दशकात सरकारी नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात त्यांनी करियर केले. फिल्मी करियरच्या सुरुवातीला अशोक सराफ यांनी बँकेत नोकरी करत आपलं स्वप्न पूर्ण केले. पण असं असलं तरीही अभिनयसृष्टीत आपलं करिअर आजमावण्यासाठी त्यांनी त्या नोकरीला सोडचिट्ठी दिली. ८०- ९०च्या दशकात सरकारी नोकरी सोडून अभिनयात प्रवेश करताना अशोक सराफ यांना आई- वडिलांचे आणि नातेवाईकांची खूप बोलणी ऐकावी लागली होती. त्यांनी जवळपास १० वर्षे ही नोकरी केली होती. पण आवड जोपासण्यासाठी त्यांनी नाटकात काम करणे सोडले नाही. सरकारी नोकरी करत असताना ते सतत एक अभिनेता होण्याचे त्यांचं राहिलेलं अभिनयाचं स्वप्न ते जगत होते.
काही दशकांच्या फिल्मी करियरमध्ये त्यांनी २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशोक सराफ यांना कलाकारांसह त्यांचा चाहतावर्गही ‘अशोक मामा’ नावानेच हाक मारतो. पण त्यांना मामा का म्हटले जाते ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. एका चित्रपटाच्या शुटिंगवेळी प्रकाश शिंदे नावाचा कॅमेरामॅन होता. ते नेहमी अशोक सराफ यांच्याकडे बोट दाखवून मुलीला म्हणायचे की, हे बघ तुझे मामा. तेव्हापासून त्यांना ‘अशोक मामा’ हे नाव पडले. अनेकजण आजही अशोक सराफ यांना ‘अशोक मामा’ म्हणूनच हाक मारतात.
अशोक सराफ यांचं मराठी कलाविश्वात मानाचं स्थान आहे. त्यांनी फक्त मराठी नाहीतर, हिंदी कलाविश्वात देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अशोक सराफ यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या सिनेकारकिर्दीत अनेक उत्कृष्ट मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहेत.