(फोटो सौजन्य - Instagram)
प्रसिद्ध टीव्ही स्टार विभू राघव यांचे २ जून रोजी मुंबईत निधन झाले. ‘निशा अँड उसके कजिन्स’ या टीव्ही मालिकेसाठी अभिनेता प्रसिद्ध होता. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण टीव्ही जगत हादरले आहे. हा अभिनेता बऱ्याच काळापासून कर्करोगाने ग्रस्त होता. त्यांचा कर्करोग चौथ्या टप्प्यात पोहोचला होता. आता त्यांचे अंतिम संस्कार झाले आहेत. अनेक टीव्ही स्टार्स त्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचले आहेत आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अनेक स्टार्स अंत्यसंस्काराला पोहोचले
विभू राघव यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या आईची प्रकृती खूपच वाईट होती. त्या खूप रडत होत्या. त्यांचे कुटुंबीय त्यांची काळजी घेत असल्याचे दिसून आले. नकुल मेहता, मोहित मलिक, मोहसिन खान, अनीरी वजानी आणि अंजली आनंद त्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचले. स्टार्सनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विभू यांना निरोप दिला. याशिवाय अनेक स्टार्सनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सौम्या टंडनने भावनिक पोस्ट लिहिली
अभिनेत्री सौम्या टंडनने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे विभू राघव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तिने लिहिले आहे की, ‘माझा सुंदर मित्र विभू राघव आता देवदूतांसोबत आहे. तो काल रात्री आपल्याला सोडून गेला. विभू तू सुंदर होतास. मनातूनही आणि बाहेरही. तू मला शिकवलेस की सगळं काही बिघडत असतानाही कसे हसायचे. जग अंधारात असताना प्रकाश कसा आणायचा. तू शेवटपर्यंत एक योद्धा होतास – एक खरा योद्धा.’ असे लिहून अभिनेत्री मित्रासाठी भावुक होताना दिसली.
Housefull 5 ची दोन क्लायमॅक्ससह दमदार ओपनिंग! ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली एवढी कमाई
सनाया इराणीने व्यक्त केल्या भावना
सनाया इराणीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर विभूचा फोटो शेअर केला आणि लिहिले ‘शांततेत विश्रांती घ्या. मला आशा आहे की तुम्ही जिथे असाल तिथे सकारात्मकता पसरवत असाल. तुम्ही जिथे असाल तिथे तुमच्यावर प्रेम आहे. तुम्ही लवकर निघून गेलात. आम्हाला तुमची आठवण येईल.’ असे लिहून अभिनेत्रीने भावुक होऊन भावना व्यक्त केल्या आहेत.
कर्नाटक उच्च न्यायालयाने कमल हसन यांना फटकारले, कन्नड वादात आणखी वाढ!
विभू राघवे कोण होते?
विभू राघवे हा एक अभिनेता आहे त्याने ‘निशा अँड उसके कजिन्स’ या शो मध्ये काम करून चाहत्यांची मने जिंकली. या मालिकेमधील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. तसेच, अभिनेता ‘सावधान इंडिया’ आणि ‘सुवरिन गुग्गल’ सारख्या शोमध्ये देखील दिसला आहे. २०२२ मध्ये अभिनेत्याला त्याच्या गंभीर आजाराबद्दल कळले की ते कोलनच्या न्यूरोएंडोक्राइन कर्करोगाने ग्रस्त आहेत. उपचारादरम्यान, विभू राघव यांनी रुग्णालयातून स्वतःचा एक फोटो शेअर केला, जो पाहून त्यांचे चाहते आश्चर्यचकित झाले. आणि अभिनेत्याबद्दल चिंता व्यक्त करू लागले.