Indian River Fishes: भारतामध्ये अनेक नद्या आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मासे आढळतात. गोडं पाणी, खारं पाणी यामध्ये विविध माशांची पैदास होत असते. भारतामध्ये उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत अनेक नद्या आहेत आणि त्या प्रत्येक नदीचे खास वैशिष्ट्य आहे ज्यामुळे या नद्यांचा इकोसिस्ट नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. पण या नद्यांमध्ये कोणत्या प्रजातीचे मासे अधिक प्रमाणात आढळतात तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या या माशांबद्दल आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल (फोटो सौजन्य - iStock)
नद्या आपल्या देशातील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यास मदत करतात आणि तितकेच महत्त्वाचे ठरतात त्यामध्ये राहणारे मासे. भारतातील प्रमुख नद्यांमध्ये कोणते मासे अधिक आढळतात जाणून घेऊया

बारामुंडी मासा हा भारतीय नद्यांमधील खाऱ्या पाण्यात अधिक आढळतो. लोकांना हा मासा अधिक चवीने खायला आवडतो.

भारतामध्ये मॅकेरल या नावाने ओळखला जाणारा मासा अर्थात बटरफिशदेखील लहान नद्यांमध्ये अधिक आढळतो. याचा खाण्यात अधिक स्वाद मिळतो

अत्यंत धोकादायक म्हणून ओळखला जाणारा मासा म्हणजे कॅटफिश. भारतीय नद्यांमध्ये याची जास्त प्रमाणात पैदास झालेली दिसून येते

बांग्लादेशमध्ये राष्ट्रीय मासा असणारा हिल्सा हा भारतात बंगालच्या खाडीमध्ये अधिक आढळतो. बंगाली लोक हा मासा अधिक खातात

उत्तर भारतीय नद्यांमध्ये कतला हा माशाचा प्रकार अधिक आढळतो. हा मासा खूपच वेगाने वाढतो आणि याचे मांस खूपच चविष्ट लागते

हिमालयी नद्यांमध्ये गोल्डन महसीर हा मासा अधिक आढळत असून अत्यंत शक्तीशाली मानला जातो. आपल्या मोठ्या आकार आणि ताकदीमुळे मासेमारांमध्ये हा प्रसिद्ध आहे






