Reels Tips: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर युजर्स वेगवेगळे रिल्स आणि व्हिडीओ शेअर करत असतात. पण हे रिल्स शेअर करताना काही महत्त्वाच्या गोष्टि लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या फॉलोवर्सची संख्या कमी होऊ शकते. त्यामुळे रिल्स पोस्ट करताना प्रत्येक युजरने काही सोप्या ट्रिक्स फॉलो केल्या तर त्यांच्या फॉलोवर्सची संख्या अगदी सहज वाढू शकते. जर तुम्हीही इंस्टाग्रामवर मोठ्या संख्येने फॉलोवर्स वाढण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी या टिप्स अगदी महत्त्वाच्या ठरणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: Instagram Reel तयार करताना चुकूनही करू नका या 5 Mistakes, नाहीतर चुटकीसरशी कमी होतील Followers
इंस्टाग्रामवर रिल्स अपलोड करताना नेहमीच क्वालिटीकडे लक्ष द्या.
रिल्स नेहमी हाय क्वालिटीमध्ये तयार करा. कारण लोकांना लो क्वालिटी आणि ब्लर व्हिडीओ आवडत नाहीत. यासोबतच ऑडियो क्वालिटी देखील चांगली ठेवा.
रिल्सचा कालावधी 30 ते 45 सेकंदांपर्यंत ठेवा.
रील अपलोड कराताना हॅशटॅगचा वापर करा, यामुळे तुमची रिल ट्रेंडिंगमध्ये दिसेल. रिल रिलेडेट टॅगच अॅड करा.
फॉलोवर्सची संख्या वाढवण्यासाठी नियमित रिल्स शेअर करा.
फॉलोवर्सनी केलेल्या कमेंटवर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा.