भारतासह जगभरात वेगवेगळ्या राज्यांमधून तयार करण्यात आलेल्या साड्या प्रसिद्ध आहेत. त्यातील कर्नाटकची शान असलेली इरकल साडी. सर्वच महिलांना इरकल साडी नेसण्यास खूप जास्त आवडते. कारण या साडीवर करण्यात आलेले बारीक नक्षीकाम, साडीची वीण इत्यादी अनेक गोष्टी साडी नेसण्यास प्रवृत्त करतात. इरकल साडी अंगावर अतिशय चापून चोपून बसते. त्यामुळे सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा कार्यक्रमाच्या वेळी तुम्ही सिल्क इरकल किंवा कॉटन इरकल मधील साडी परिधान करू शकता. इरकल साडी खणाच्या साडीप्रमाणे काहीशी दिसते. मात्र साडी तयार करण्यासाठी वापरले जाणारे फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आणि सुंदर आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
मायेची ऊब देणारी इरकल साडी! सणावाराच्या दिवसांमध्ये नेसा 'या' सुंदर डिझाइन्सची इरकल साडी
बुट्ट्या वर्क करून तयार केलेली इरकल पैठणी बाजारात खूप जास्त प्रसिद्ध आहे. इरकल पैठणीची क्रेज सगळीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
लग्न समारंभ किंवा साखरपुड्याच्या कार्यक्रमात तुम्ही या पद्धतीची सिल्क इरकल साडी नेसू शकता. यामुळे तुमचा लुक अतिशय सुंदर आणि उठावदार दिसेल.
ऑफिस वेअरमध्ये सिंपल साडी हवी असल्यास तुम्ही या पद्धतीची रेशीम वर्क केलेली इरकल साडी नेसू शकता. या साडीच्या आतमध्ये चौकोणी बॉक्स तयार करून साडीवर नक्षीकाम केले जाते.
बुट्या आणि वेगवेगळ्या डिझाइन्सचे नक्षीकाम असलेली इरकल साडी कोणत्याही कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर वाटेल. इरकल साडीवर सोनं, चांदी किंवा मोत्याचे दागिने अतिशय सुंदर दिसतात.
घरातील कार्यक्रमांच्या दिवशी तुम्हाला जर जास्त हेवी लुक नको असेल तर तुम्ही या पद्धतीची साधी इरकल कॉटन साडी नेसू शकता. यामध्ये अनेक रंग बाजारात उपलब्ध आहेत.