गोवा महामार्गाची झालेली दुरावस्था गणेशोत्स तोंडावर येऊन ठेपला असताना अपूर्ण रस्त्याची कामांवरुन निषेध नोंदवण्यात आला आहे. पनवेल जवळील पळस्पे फाटा येथे मुंबई – गोवा महामार्ग जनआक्रोश समिती तर्फे गणेशाचे पाट पूजन करून सरकार विरुद्ध आंदोलन छेडण्यात आले .आज परिस्थिती पहाता कोकणकरांच्या श्रद्धा आणि संघर्षाचे प्रतीक म्हणून महामार्गाचा महाराजा या गणेशोत्सवाचा पाठपूजन सोहळा अबूतपूर्व उत्साहात करण्यात आला. महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि कोकणकरांचा प्रवास सुखरूप व्हावा तसेच रस्त्यावरील सर्व विघ्ने दुर व्हावीत या एकाच भावनेने उपस्थित कोकणकर मनात गणरायाच्या चरणी हात जोडून अर्थ विनवणी करत होता . गणेशोत्सव आपल्या गावी जाण्यासाठी कोकणकरांना अनेक तासांच्या वाहतूक कोंडीचा तसेच जीव घेण्या खड्ड्यांचा व रस्त्यावरील अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे प्रवासाचा आनंद तर दूरच पण प्रत्येक वेळी सुरक्षित घरी पोहोचण्याची चिंता मनात कायम असते त्याच पार्श्वभूमीवर आजच्या या पाठपुजण सोहळ्यांनी कोकणकरांच्या सामूहिक वेदनांना वाचा फोडली आहे व यातून सरकारला जाग येईल अशी त्यांची भोळी आशा आहे . या गणरायाच्या आशीर्वादानेच आता या महामार्गावरील सर्व अडथळे दूर होतील काम जलद गतीने पूर्ण होईल आणि पुढील वर्षीचा प्रवास सुखाचा होईल अशी प्रत्येक कोकणकराची मनापासून इच्छा आहे.