वसई: मुंबईलगतच्या वसईमध्ये भरदिवसा तब्बल 1.5 कोटी रुपयांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १० ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. घरात एकटेच वृद्ध गृहस्थ उपस्तिथ असल्याचे पाहत चोरट्यांनी संधी साधली आणि घरात धाड टाकली. ही घटना वसईच्या पश्चिम येथील किशोर कुंज सोसायटीत घडली. उधोजी भानुशाली यांच्या घरात ही चोरी झाली. उधोजी भानुशाली यांचा मुलगा मितेश, आई आणि घरातील महिला रक्षाबंधन साजरा करण्यासाठी मामाच्या घरी गेले होते. त्यावेळी ते एकटे घरात होते. त्याचवेळी ही घटना घडली.
Jalgaon Crime: जळगावमध्ये २१ वर्षीय तरुणाची टोळक्याकडून निर्घृण हत्या;आई-वडिलांनाही बेदम मारहाण
नेमकं काय घडलं?
सर्वात आधी चोरांनी वृद्ध उधोजी भानुशाली यांना त्यांच्या कच्छी बोली भाषेत बोलण्यात गुंतवले. आजोबांना याचं परिसरात भाड्याने घर पाहिजे असे सांगून आजोबांना बोलण्यात गुंतवले. आधी पिण्यासाठी पाणी मागितले आणि नंतर वॉशरूममध्ये जायचं आहे असं सांगून वॉशरूमला गेला.पण लगेचच ओरडत बाहेर येऊन तुमचे टॉयलेट लिकेज आहे. आजोबा देखील घाईगडबडीत नेमकं काय झाले ते बघण्यासाठी बाथरूममध्ये गेले. त्याचवेळी चोरट्याने त्यांना मागून धक्का दिला आणि टॉयलेटमध्ये बंद करून बाहेरून कडी लावून घेतली. त्यांनतर चोरट्यांनी संपूर्ण घरातील रोक रक्कम, दागदागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू लंपास केल्या. चोरी गेलेली एकूण रक्कम सुमारे 1 कोटी 50 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे.
पोलिसांचा तपास सुरु
ही घटना भरदिवसा घडल्यामुळे स्थानिक रहिवाश्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, तसेच dog squad च्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास माणिकपूर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबई हादरली! प्रियकरासह मिळून पत्नीने केली पतीची हत्या
मुंबईतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने तिच्या प्रियकरासह मिळून तिच्या पतीला अमानुष मारहाण करून हत्या केल्याचं समोर आलं आहे. मृत पती हा व्यवसायाने फिल्म सिटीमध्ये मेकअप आर्टिस्ट आहे. हत्या झालेल्याव्यक्तीचे नाव भरत अहिरे (४० वर्षीय) आहे. ही घटना आरे कॉलनीतील छोटा काश्मीर गार्डन परिसर येथे घडली आहे. भरत अहिरे आणि त्याची पत्नी राजश्री तिचा प्रियकर याने मिळून भरतचा जीव घेतला आहे.