सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीपासून 'हे' ५ पदार्थ
सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही नाचणीच्या पीठापासून डोसा बनवू शकता. हा डोसा आरोग्यसाठी फायदेशीर ठरेल. तसेच नाचणीमध्ये असलेले पौष्टिक घटक आरोग्यसाठी गुणकारी आहेत.
नाचणीच्या पीठापासून तुम्ही साखर गुळाचा वापर न करता लाडू बनवू शकता. हे लाडू मधुमेहचा त्रास असलेलं रुग्ण देखील खाऊ शकतात.
मैद्याच्या पिठापासून केक बनवण्याऐवजी नाचणीच्या पीठापासून केक तयार करा. केक बनवण्यासाठी गूळ पावडर, दूध, व्हॅनिला इसेन्स, बेकिंग सोडा आणि बटर टाकून मिश्रण तयार करा. हे मिश्रण ओव्हन मध्ये ठेवून केक शिजवून घ्या.
इडलीच्या तयार केलेल्या पीठामध्ये नाचणीचे पीठ टाकून तुम्ही नाचणीची इडली बनवू शकता. ही चवीला सुंदर आणि आरोग्यसाठी पौष्टिक आहे.
नाचणीपासून पॅनकेक बनवण्यासाठी मॅश केलेल्या केळ्यामध्ये नाचणीचे पीठ मिक्स करून नट पावडर टाका. पॅनवर तूप गरम करून छोटे छोटे पॅनकेक बनवून घ्या.