Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अचानक हृदयाची धडधड वाढते? उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

उच्च रक्तदाब वाढल्यानंतर डोकेदुखी, छातीत वेदना, धूसर दिसणे, थकवा जाणवू लागल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार आवश्यक आहे. अन्यथा शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. चला तर जाणून घेऊया उच्च रक्तदाब वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 24, 2026 | 08:03 AM
अचानक हृदयाची धडधड वाढते? उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

अचानक हृदयाची धडधड वाढते? उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

उच्च रक्तदाब वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
उच्च रक्तदाबाची कारणे?
जीवनशैलीतील कोणत्या गोष्टींचा आरोग्यावर परिणाम होतो?

धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होत आहे. हृदयाच्या आजारांसोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातील अतिशय सामान्य वाटणारा पण शरीरासाठी सायलेंट किलर आजार म्हणजे उच्च रक्तदाब. या आजारात सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सौम्य वाटणारी लक्षणे दिसून येतात. पण कालांतराने शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही क्षणी ब्रेन स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो. याशिवाय किडनीचे आजार आणि मेंदूशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वाढत्या उच्च रक्तदाबाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अन्यथा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.(फोटो सौजन्य – istock)

उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर डोकं खूप जास्त दुखतं? मग ‘हे’ उपाय करून मिळवा कायमचा आराम, जुनाट त्रासांपासून मिळेल सुटका

बऱ्याचदा उच्च रक्तदाब वाढल्यानंतर डोकेदुखी किंवा मेंदूच्या नसांवर तणाव आल्यासारखे जाणवू लागते. तर सकाळी उठल्यानंतर डोक्याच्या मागील भागात तीव्र वेदना जाणवू लागतात. या वेदना रक्तदाब वाढल्यामुळे उद्भवतात. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांवर जास्तीचा तणाव येतो, ज्याचा परिणाम मेंदूतील रक्तप्रवाहावर होतो आणि डोके जड होणे, चक्कर येणे किंवा अस्वस्थ वाटणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांना मायग्रेन किंवा सामान्य डोकेदुखी समजली जाते. पण असे नसून उच्च रक्तदाब वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आहेत. चला तर जाणून घेऊया उच्च रक्तदाब वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.

उच्च रक्तदाब वाढल्यानंतर दिसून येणारी गंभीर लक्षणे:

शरीराचा रक्तदाब वाढल्यानंतर रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्तीची मेहनत घ्यावी लागते. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर तणाव निर्माण होतो. जिने चढताना, चालताना किंवा अगदी आराम करताना सुद्धा काहींच्या छातीमध्ये जडपणा जाणवतो. तसेच श्वास घेण्यास त्रास होणे, अस्वस्थता, घाम येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. डॉक्टरांच्या मते, शरीरात दिसून येणारी ही लक्षणे हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजाराचा धोका निर्माण करतात. बऱ्याचदा शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो.

रक्तदाब वाढल्यानंतर शरीरातील अवयवांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा करण्यास अडथळा निर्माण होतो. याशिवाय शरीर खूप जास्त थकल्यासारखे वाटते. लक्ष केंद्रित न होणे, चिडचिड वाढणे किंवा कामात उत्साह न वाटणे इत्यादी मानसिक लक्षणे बिघडण्याची जास्त शक्यता असते. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास शरीराला गंभीर आजाराची लागण होते.

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? मग आहारात ‘या’ ६ सुपरफूड्सचा करा समावेश

उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे:

चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, फास्ट फूड, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, मद्यपान आणि सततचा मानसिक ताण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शरीरात निर्माण झालेली झोपेची कमतरता आणि लठ्ठपणा गंभीर आजारांचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप इत्यादी गोष्टी शरीरासाठी खूप जास्त गरजेच्या असतात. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेऊन शरीराची काळजी घ्यावी. डोकेदुखी, छातीत वेदना, धूसर दिसणे, थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उच्च रक्तदाबाची सामान्य लक्षणे कोणती असतात?

    Ans: डोकेदुखी, चक्कर येणे, धूसर दिसणे, थकवा, छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसू शकतात.

  • Que: उच्च रक्तदाब नेहमी लक्षणांसह दिसून येतो का?

    Ans: नाही. अनेकदा उच्च रक्तदाबाला “सायलेंट किलर” म्हटले जाते कारण सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे जाणवत नाहीत.

  • Que: हृदयाची धडधड वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा का?

    Ans: जर धडधडीसोबत छातीत वेदना, चक्कर किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

Web Title: Sudden heart palpitations do not ignore these symptoms that appear in the body after high blood pressure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 08:03 AM

Topics:  

  • blood pressure
  • Health Care Tips
  • health issues

संबंधित बातम्या

Dietary Supplements: अमेरिकेतील 78% नागरिक का घेतात हेल्थ सप्लिमेंट्स? तरुणांमध्ये सर्वाधिक क्रेझ; वाचा प्यू रिसर्चचा नवा अहवाल
1

Dietary Supplements: अमेरिकेतील 78% नागरिक का घेतात हेल्थ सप्लिमेंट्स? तरुणांमध्ये सर्वाधिक क्रेझ; वाचा प्यू रिसर्चचा नवा अहवाल

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
2

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
3

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.