Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? मग आहारात ‘या’ ६ सुपरफूड्सचा करा समावेश

Healthy Foods For Heart: हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी दररोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 23, 2026 | 08:05 PM
Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? मग आहारात ‘या’ ६ सुपरफूड्सचा करा समावेश
Follow Us
Follow Us:
  • हृदय निरोगी ठेवायचंय?
  • आहारात ‘या’ ६ सुपरफूड्सचा करा समावेश
  • हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
आजकाल बदलती जीवनशैली, तणाव, फास्ट फूड आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढताना दिसत आहे. कमी वयातही हार्ट अटॅकच्या घटना समोर येत असल्याने हृदयाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे. डॉक्टरांच्या मते, नियमित व्यायामासोबत योग्य आहार घेतल्यास हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. काही खास पदार्थ असे आहेत जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास आणि हृदय मजबूत ठेवण्यास मदत करतात. तसेच, अनेक पौष्टिक कमतरता दूर करण्यासही मदत होते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी दररोज कोणत्या सूपरफूडचे सेवन केले पाहिजे, जाणून घ्या.

High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ ठरू शकतात धोकादायक; आजच खाणं टाळा

बदाम

बदामामध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. रोज मर्यादित प्रमाणात बदाम खाल्ल्यास हृदय निरोगी राहण्यास मदत होते. म्हणून दररोजच्या आहारात बदामाचा समावेश करा.

हिरव्या पालेभाज्या

निरोगी हृदय राखण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणे देखील आवश्यक आहे. पालक, मेथी, शेपू आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, आयरन आणि अनेक पोषक तत्त्वे असतात. या भाज्या ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करतात.

ग्रीन टी

दूधाच्या चहाऐवजी ग्रीन टीचा समावेश केल्यास शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. ग्रीन टीमधील अँटिऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात.

अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि हेल्दी फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. जे रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यातही अक्रोड फायदेशीर मानले जाते.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि हृदयविकारांचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.

मासे

तुम्ही सॅल्मन, मॅकरेल, सार्डिन आणि ट्यूना यांसारखे मासे खाऊ शकता. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते जे निरोगी हृदय राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टीही महत्त्वाच्या

  • दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा
  • तेलकट आणि जंक फूड कमी खा
  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा
  • नियमित हेल्थ चेकअप करा
  • तणाव शक्य तेवढा कमी करण्याचा प्रयत्न करा
टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

रफ केसांना म्हणा बाय-बाय! केस धुण्यापूर्वी करा ‘हा’ सोपा उपाय; केस होतील सॉफ्ट, सिल्की आणि चमकदार

Web Title: Superfoods for healthy heart heart attack prevention diet tips marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • Beneficial for the heart
  • Health Care Tips
  • Healthy Foods
  • heart care tips

संबंधित बातम्या

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान
1

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान

Health Update: नऊ महिन्यांच्या चिमुकलीच्या हृदयावर यशस्वी उपचार! ५ मिमीचा अडथळा दूर करत श्वसनसंसर्गाचा त्रास थांबविण्यात यश
2

Health Update: नऊ महिन्यांच्या चिमुकलीच्या हृदयावर यशस्वी उपचार! ५ मिमीचा अडथळा दूर करत श्वसनसंसर्गाचा त्रास थांबविण्यात यश

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
3

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
4

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.