देशात सणासुदीच्या काळामध्ये खरेदी जास्त केली जाते. या दिवसांमध्ये अनेक भरती नव्या वस्तू घरी लक्ष्मी रुपी आणतात. अशा मध्ये अनेक कुंटुंब दुचाकी घेण्याचा विचार करत असतील. या दिवाळीत जर तुम्ही स्वस्तात मस्त अशी दुचाकी घेण्याचा विचार करत आहात तर 'या' बाईक्स तुमच्या नक्कीच पसंतीस येतील. गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण देश 'या' दुचाकींवर भरभरून प्रेम करता आहे. मुळात, 'या' दुचाकी उत्तम मायलेज आणि किफायतशीर किंमतीसह दिवाळीमध्ये खरेदीसाठी योग्य पर्याय ठरतील.
या आहेत ७० हजाराच्या बजेटमध्ये बेस्ट बाईक्स. (फोटो सौजन्य - Social Media)
हिरो एचएफ डिलक्स या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत ₹५९,९९८ ते ₹६९,०१८ दरम्यान आहे. मायलेजसाठी ही बाईक खूपच प्रसिद्ध आहे.
होंडा शाइन 100 या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत ₹६४,९०० आहे. होंडा शाइन ही बाजारात लोकप्रिय असलेली विश्वसनीय बाईक आहे.
टीव्हीएस एक्सएल 100 या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत ₹४४,९९९ ते ₹६०,९०५ आहे. कमी बजेटमध्ये उत्तम परफॉर्मन्स देणारी बाईक म्हणून या गाडीकडे पाहिले जाते.
बजाज प्लॅटिना 100 या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत ₹६८,६८५ आहे. ही बाईक मायलेज आणि आरामासाठी ओळखली जाते.
हिरो एचएफ 100 या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत ₹५९,०१८ आहे. देशातील सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या दुचाकींमध्ये या बाईकची गणना होते.