प्रिन्स नरूला आणि युविका चौधरी, हे जोडपं देशातील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. बिग बॉसच्या घरातून सुरु झालेले हे प्रेम प्रकरण, २०१८ साली विवाह बंधनात अडकले. लग्नाच्या अवघ्या ६ वर्षांनी दोघांना गॉड मुलगी झाली आहे. त्यांनी ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. सोशल मीडियावर दोघांसाठी शुभेच्छांचा तसेच नव्या बाळासाठी आशीर्वादांचा वर्षाव होत आहे.
प्रिन्स नरुला आणि त्याची पत्नी युविका चौधरीला मुलगी झाली. (फोटो सौैजन्य - Social Media)
'बिग बॉस पर्व ९' मधून सुरु झालेली प्रिन्स आणि युविकाची लव्ह स्टोरीचे २०१८ मध्ये विवाहात रूपांतर झाले. लग्नाच्या सहा वर्षांनंतर यांना पुत्रप्राप्ती झाली आहे.
प्रिन्स नरुला आणि त्याची पत्नी युविका चौधरी यांच्या घरात एका चिमुकलीचा जन्म झाला आहे. प्रिन्स व युविका यांनी आई-बाबा होणार असल्याची खुशखबर सोशल मीडियावर सांगितली आहे.
प्रिन्सचे वडील जोगिंदर नरुला यांनी यावर आमच्या घरी मुलगी जन्माला आली आहे आणि आम्ही खूप आनंदी असल्याचे सांगितले आहे.
या जोडीविषयी विशेष म्हणजे प्रिन्स युविकापेक्षा ७ वर्षांनी लहान आहे. प्रिन्सचे वय ३३ वर्षे आहे तर युविकाचे वय ४० वर्षे आहे. प्रिन्स युविकापेक्षा ७ वर्षे लहान आहे.
मुलगी झाल्याने नरुला कुटुंबीय फार आनंदित आहेत. ७ ऑगस्ट २०२४ रोजी युविकाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला होता.