सर्वच महिला कार्यक्रमांच्या वेळी ब्राईट कलर घालण्यास जास्त प्राधान्य देतात. या रंगांपैकी एक म्हणजे पिवळा रंग. पिवळ्या रंगाची साडी नेसल्यानंतर त्यावर महिला कोणत्याही रंगाचा कॉन्ट्रास्टिट ब्लाऊज परिधान करतात. यामुळे खूप स्टयलिश आणि क्लासी लुक दिसतो., महिलानांच्या कपाटात अनेक वेगवेगळ्या रंगाच्या साड्या, वेगवेगळ्या डिझाइन्सचे सुंदर ब्लाऊज असतात. त्यामुळे पिवळ्या रंगाचा साडीवर तुम्ही मिसमॅच करून कोणत्याही डार्क रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकता. आज आम्ही तुम्हाला पिवळ्या रंगाच्या साडीवर कोणत्या रंगाचा कॉन्ट्रास्टिट ब्लाऊज परिधान करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
पिवळ्या रंगाच्या साडीवर शोभून दिसतील 'या' उठावदार रंगाचे ब्लाऊज
बदलत्या फॅशनच्या युगात महिला कोणत्याही रंगाच्या साडीवर कोणताही कॉन्ट्रास्टिट किंवा मिसमॅच केलेला ब्लाऊज महिला परिधान करतात. त्यामुळे तुम्ही डार्क पिवळ्या रंगाच्या साडीवर जांभळ्या रंगाचा सुंदर हँड पेंटिंग केलेला ब्लाऊज घालू शकता.
निळ्या रंगाचा ब्लाऊज सगळ्यांकडेच असतो. त्यामुळे तुम्हाला तर स्टयलिश लुक हवा असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाच्या साडीवर निळा ब्लॉउज परिधान करू शकता.
पिवळ्या रंगाच्या साडीवर तुम्ही गुलाबी रंगाचा सुंदर ब्लाऊज परिधान करू शकता. डार्क गुलाबी रंगाचा प्लेन ब्लाऊज किंवा वर्क केलेला ब्लॉउज पिवळ्या रंगाच्या साडीवर उठावदार दिसेल.
पिवळा आणि पांढरा कॉम्बिनेशन अतिशय क्लासी दिसते. पिवळ्या रंगाचा ब्लाऊज तुमच्याकडे नसल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज साडीवर घालू शकता.
पैठणी साडीप्रमाणेच सोशल मीडियावर पैठणी ब्लाऊजची सुद्धा खूप मोठी क्रेझ आहे. त्यामुळे तुम्ही काठपदरच्या पिवळ्या किंवा इतर रंगाच्या साडीवर पैठणी ब्लाऊज घालू शकता. यामध्ये तुमचा लुक इतरांपेक्षा हटके दिसेल.