सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बेकायदेशीर फटाक्यांचे साठे आणि गोडाऊन असल्याची तक्रार दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. महापालिका अधिकाऱ्यांना फटाक्यांचे परवाने देण्याची परवानगी नसतानाही अशा तऱ्हेचे बेकायदेशीर परवाने दिले जात असल्याचेही मोहिते यांनी म्हटले आहे. अशा बेकायदेशीर फटाक्यांच्या गोडाऊनमुळे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचे प्राण धोक्यात असून या बेकायदेशीर गोडाऊन वर आणि साठ्यांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास येत्या बुधवारी महापालिकेच्या अग्निशमन त्याला समोर फटाके घेऊन आंदोलन करण्याचा इशारा उत्तम मोहिते यांनी दिलाय.
.