पंढरपूर-आळंदी पालखी मार्गाचे काम संत गतीने
पंढरपूर : पंढरपूर-आळंदी ते देहू या पालखी मार्गाचे गेल्या अनेक वर्षांपासून काम चालू आहे. मात्र, वाखरी ते पंढरपूर या अंतरामध्ये गेल्या दोन वर्षांपासून काम रखडले असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर पुणे-सातारा-मुंबई आणि अन्य ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची गर्दी असते. मात्र, गेल्या दोन वर्षापासून वाखरी ते पंढरपूर या अंतरातील काम संथ गतीने चालू असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
या मार्गावरून जाताना वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून जावे लागत आहे. तसेच वाहनापासून उडणारा धुरळा आणि यापासून होणारे अनेक आजार याचा सामना पंढरपूरवासियांना करावा लागत आहे. या मार्गावर खड्डे व धुळीचे साम्राज्य जास्त असल्यामुळे वाहन चालकांना व रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेते आणि फळ विक्रेते यांनाही या धुळीचा सामना करावा लागत आहे. मात्र, या पालखी महामार्गाच्या ठेकेदारास व अधिकाऱ्यास संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेदेखील वाचा : Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी
याशिवाय, लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे. अन्यथा या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी सर्वसामान्य नागरिकांमधून चर्चा केली जात आहे.
विकासकामांबाबत नागरिकांची नाराजी
पालखी महामार्गाच्या कामांमध्ये अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने काम चालू असल्याचे दिसून येत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करत एखादा अनुसूचित प्रकार घडल्यास त्या अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, असेही नागरिकांमधून बोलले जात आहे.
पंढरपुरात फुटले नवे वादाला तोंड
श्री विठ्ठल-रुक्मिणी देवांच्या अभिषेकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी मंदिर प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी देवांच्या अभिषेकासाठी स्थानिक चंद्रभागा नदीचे पाणी न वापरता उत्तर प्रदेशातील गंगाजल आणले जात आहे.