केडीएमसी निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असली, तरी प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अहवाल सादर न करता ही प्रक्रिया पूर्ण केल्याचा आरोप सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने केला आहे.समितीचे पदाधिकारी सुमित वझे यांनी सांगितले की, २७ गावांमधून प्रभाग रचनेविरोधात तब्बल ३,६४२ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, या हरकतींची स्वतंत्र सुनावणी घेण्यात आली नाही. याबाबत समितीने निवडणूक आयोगाला तक्रार केली होती. आयोगाने केडीएमसी आणि नगरविकास विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.