26/11 मुंबई दहशतवादी हल्ला हा भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला म्हणून स्मरणात आहे. तब्बल 60 तास चाललेल्या या दहशतवादी हल्ल्यात 166 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला तर शेकडो जण जखमी झाले होते. त्यानंतर 26/11 हा काळादिन म्हणून साजरा केला जातो. आता या हल्ल्यातील अनेक घटनांवर अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत यावर एकदा नजर टाका.
फोटो सौजन्य - सोशल मीडिया
हॉटेल मुंबई - 26/11 च्या हल्ल्यातमध्ये दहशतवाद्यांनी प्लॅन केलेल्या हल्ल्यामध्ये ताज हॉटेल हे एक मुख्य ठिकाण होते. हॉटेल मुंबई या चित्रपटामध्ये ताजवर झालेल्या घटनांचे चित्रीकरण दाखवण्यात आले आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
द अटॅक ऑफ 26/11 - नाना पाटेकर यांचा प्रसिद्ध सिनेमा "द अटॅक ऑफ 26/11" २०१३ मध्ये तयार करण्यात आला होता. यामध्ये नाना पाटेकर हे मुख्य भूमिकेत होते यामध्ये नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
शहिद - 26/11च्या हल्ल्यात कार्यकर्ते शहिद आझमी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता राजकुमार राव आहे. परंतु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मुंबई डायरीझ - २०११ मध्ये प्रदर्शित करण्यात आले ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ ओरिजनलवर हा चित्रपट प्रेक्षक पाहू शकतात. हा चित्रपट निखिल गोन्साल्विस आणि निखिल अडवाणी तयार केला होता, या चित्रपटामध्ये 26/11 हल्ल्यात झालेल्या घटना सखोल दाखवल्या आहेत. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
एम्बर्स - 26/11च्या हल्ल्यात अनेक लोकांनी त्यांचा जीव गमावला. यामध्ये दोन विदेशी पती पत्नींच्या जीवनावर आधारित एम्बर्स या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. फोटो सौजन्य - सोशल मीडिया