कडक उन्हाळ्यात शरीराला थंडाव्या देण्यासाठी 'या' पदार्थांचे नियमित करा सेवन
तापमान जास्त वाढल्यानंतर शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. शरीराचे तापमान वाढल्यानंतर डिहायड्रेशनची समस्या वाढू लागते. त्यामुळे नियमित नारळ पाण्याचे सेवन करावे. नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, मिनर्ल्स आणि विटामिन आढळून येतात.
रोजच्या आहारात मुगडाळ, चणाडाळ याशिवाय इतर डाळींचे नियमित सेवन करावे. या डाळींमध्ये प्रोटीन, आयरन, आणि विटामिन बी १२ इत्यादी अनेक घटक आढळून येतात. डाळींमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात.
उन्हाळयात लिंबू आणि पुदिन्याला जास्त मागणी असते. लिंबू सरबत, लिंबू मोजितो किंवा लिंबापासून तयार केलेले इतर पदार्थ बनवू शकता. लिंबू आणि पुदिन्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीर थंड राहील.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराला पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन करावे. यामध्ये तुम्ही मुगाची खिचडी, डाळ खिचडी, वरण भात किंवा इतर पौष्टिक पदार्थ खावेत. हे पदार्थ सहज पचन होतात.
सर्वच ऋतूंमध्ये शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे दररोज भरपूर पाणी प्यावे.