गुइलेन-बॅरे सिंड्रोमपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी आहारात करा 'या' पौष्टिक पदार्थाचे सेवन
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीर डिहायड्रेट होऊन जाते. त्यामुळे नियमित ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे.
आहारामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्चे सेवन करणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या बियांचा आहारात समावेश करू शकता. चिया सीड्स, अक्रोड, भोपळ्याच्या बिया इत्यादी पदार्थांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् आढळून येते.
मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी विटामिन बी १२ अतिशय महत्वाचे आहे. शरीरात विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहारात मासे, अंडी, पनीर आणि दुग्धजन्य पदार्थ इत्यादींचे सेवन करावे.
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी आहारात पौष्टिक आणि शरीराला पचन होतील अशा पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. मांस, चिकन, सोया, पनीर, आणि डाळी इत्यादी प्रोटीन युक्त पदार्थांचे आहारात नियमित सेवन करावे.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यासाठी आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. शरीरासाठी विटामिन सी अतिशय महत्वाचे आहे. आहारात तुम्ही आवळा, संत्री, पेरू, लिंबाचा रस इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता.