Copper Rich Foods: कॉपर अर्थात तांबं हे आपल्या शरीरासाठी आवश्यक खनिजांपैकी एक आहे, जे शरीरातील अनेक महत्त्वपूर्ण कार्ये नियंत्रित करण्यास मदत करते. हाडे, मज्जासंस्था आणि रोगप्रतिकार यंत्रणेच्या योग्य कार्यासाठी हे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, तांबे लोहाचे शोषण, लाल रक्तपेशी तयार करण्यास आणि शरीरात एन्झाईम्सचे उत्पादन करण्यास मदत करते. तांब्याच्या कमतरतेमुळे शरीरात अशक्तपणा, थकवा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. पोषणतज्ज्ञ निखिल वत्स यांनी कोणते पदार्थ आहेत ज्यामध्ये तांबे मुबलक प्रमाणात आढळतात हे सांगितले आहे. (फोटो सौजन्य - iStock)
आपण जेवणामध्ये अनेक पदार्थांचा समावेश करून घेतो. मात्र आपल्या शरीराला लागणारे कॉपर नक्की कोणत्या पदार्थांमधून मिळते याबाबत अधिक माहिती घेऊया
मशरूम कॉपरचा उत्कृष्ट स्रोत आहे. विशेषत: शिताके मशरूममध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. शरीरातील कॉपरची कमतरता दूर करण्यासाठी मशरूमचे सेवन हा एक चांगला उपाय आहे. तुम्ही ते सूप, सॅलड किंवा मुख्य आहारात समाविष्ट करू शकता
डार्क चॉकलेट केवळ स्वादिष्टच नाही तर त्यात तांबे देखील भरपूर प्रमाणात असते.नियमितपणे काही डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला आवश्यक प्रमाणात तांबे मिळू शकतात, मात्र याचे मर्यादित सेवन करावे
तीळ आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये भरपूर कॉपर असून मॅग्नेशियम, जस्त आणि व्हिटॅमिन ई सारखे इतर पोषक घटकदेखील असतात. तुम्ही या बिया सॅलड, स्मूदी किंवा दह्यामध्ये घालून सेवन करू शकता
काजूचे नियमित सेवन केल्याने शरीरातील कॉपरची कमतरता दूर होऊ शकते. काजूमध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि फायबरदेखील असतात. तुम्ही काजू थेट खाऊ शकता किंवा डेझर्ट आणि सूपमध्ये घालू शकता.
राजमा ज्याला किडनी बीन्स देखील म्हणतात, कॉपरचा आणखी एक चांगला स्त्रोत आहे. त्यात फायबर, प्रथिने आणि इतर आवश्यक खनिजे देखील असतात. तुमच्या पचन आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते