लग्नातील रिसेप्शन लुकची तयारी मुली दोन ते तीन महिने आधीपासूनच करतात. रिसेप्शनसाठी लागणारा लेहेंगा किंवा साडी, दागिने, मेकअप इत्यादी अनेक गोष्टींची तयारी आधीपासूनच केली जाते. मात्र बऱ्याचदा रिसेप्शन लुकसाठी कशा पद्धतीने हेअर स्टाईल करावी? हे मुलींना सुचत नाही. वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटवर हेअर स्टाईलचे फोटो सर्च केले जातात. अशावेळी मुलींचा जास्त गोंधळ उडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लग्नातील रिसेप्शन लुकसाठी पारंपरिक अंबाडा हेअर स्टाईलचे काही प्रकार सांगणार आहोत. या हेअर स्टाईल लग्नात नक्की ट्राय करून पहा. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नातील रिसेप्शन लुकसाठी करा पारंपरिक अंबाड्याची हेअरस्टाइल
लग्नातील रिसेप्शन लुकसाठी तुमच्याकडे कमी वेळ असल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बन हेअर स्टाईल करू शकता. बन हेअर स्टाईल करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अंबाडा बांधून त्यावर तुम्ही गजरे किंवा फुल लावू शकता.
तुम्हाला जर थोडा स्टयलिश आणि वेस्टन लुक हवा असेल तर तुम्ही या पद्धतीची सुंदर हेअर स्टाईल करू शकता. यामध्ये तुमचा लुक अतिशय सुंदर आणि उठावदार दिसेल.
काहींना भरपूर गजरे घालायला खूप आवडतात. अशावेळी तुम्ही पारंपरिक अंबाडा बांधून त्यावर तुम्ही भरगच्च गजरे लावून या पद्धतीची हेअर स्टाईल करू शकता. तुमच्या केसात गजरे सुंदर दिसतील.
मेसी बन बांधायला सगळ्यांचं खूप आवडतं. मेसी बन हेअर स्टाईल कोणत्याही साडीवर किंवा लेहेंग्यावर अतिशय सुंदर दिसेल. बन हेअर स्टाईल केल्यानंतर त्यावर सुंदर सुंदर फुले लावू शकता.
तुम्हाला थोडा मॉर्डन आणि हटके लुक हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने सुंदर हेअर स्टाईल करू शकता. ही हेअर स्टाईल केल्यानंतर गुलाबाची किंवा बारीक बारीक रंगीत फुल लावल्यास अतिशय देखणी दिसतील.