Nashik News: जानेवारी २०२७ पर्यंत सिंहस्थाची सर्व विकास कामे पूर्ण होणार; मनपा आयुक्त मनिषा खत्री यांचे आश्वासन
गत सिंहस्थाचा विचार केल्यास ऑक्टोंबर २०१३ मध्ये त्यावेळच्या कामांची निविदा प्रक्रीया पूर्ण करण्यात आली होती. यंदा मात्र आपण जुलैमध्येच सर्व कामांचे नियोजन करून त्यापैकी जवळपास २० टक्के कामे पूर्ण केली आहेत. साधारणतः जानेवारी २०२७ मध्ये शहरातील सिंहस्थाची सर्व विकास कामे पुर्ण होतील व त्यानंतर फक्त कामांची चाचणी हेच काम शिल्लक राहिल, त्यामुळे सिंहस्थाची कामे सुरू झाली नाहीत असे म्हणणे योग्य ठरणार नसल्याचा निर्वाळा मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी दिला आहे. यावेळी त्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या.
नोव्हेंबरपासूनच थंडीला सुरुवात; तापमानात होतीये घट, काही ठिकाणी धुके…
महापालिकेची आरक्षण सोडत अतिशय पारदर्शीपणे पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त करून आयुक्त खत्री यांनी शहरातील सिंहस्थ व विविध कामांची माहिती दिली. एसटीपीचे काम सुरू न होताच ठेकेदाराला पेमेंट केल्याचे काही ठिकाणी वृत्ते आली परंतु ते चुकीचे आहे. त्यातील बरेचसे काम सुरू झाले आहे असे सांगून आयुक्तांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासन पातळीवरून निधीची पुर्तता करण्यात आल्याने त्या दृष्टीने कामांचे वर्कऑर्डर देण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
यातील अनेक कामांसाठी मोठ मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या तसेच स्थानिक ठेकेदारांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धा वाढल्यामुळे अनेक कामे १५ ते १६ टक्के न्युनतम दराने गेले आहेत. त्यातून महापालिकेची सुमारे दिडशे कोटी रूपयांची बचत झाली असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. शहरात सुमारे १०० किलोमिटरच्या रस्त्यांची ९०० कोटी रूपये खर्चाची कामे सुरू करण्यात आली आहेत.
या कामांमध्ये झालेल्या बचतीतून हा निधी रस्ते व खड्डे बुजविण्यासाठी वापरला जाईल. शिवाय पुढच्या वर्षी नवीन लोकनियुक्त सदस्य येतील त्यांनाही त्यांच्या प्रभागात विकास कामांसाठी या निधीचा उपयोग करून घेता येईल असेही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील विकास कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने रामकाल पथ, डीडब्ल्यू टी, एस.टी.पी. अमृत योजना, गोदाघाट विस्तारीकरण, रस्त्यांचा शुभारंभ असे अनेक कामांचा समावेश आहे. यातील बरीचशी कामे यापुर्वीच सुरू करण्यात आल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.
सिंहस्थ कभमेळा होताच ठेकेदाराला पेमेंट केल्याचे काही ठिकाणी वृत्ते आली परंतु ते चुकीचे आहे. त्यातील बरेचसे काम सुरू झाले आहे असे सांगून आयुक्तांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासन पातळीवरून निधीची पुर्तता करण्यात आल्याने त्या दृष्टीने कामांचे वर्कऑर्डर देण्यात आले आहेत.
Maharashtra Local Body Elections 2025: निवडणूक आदर्श आचारसंहिता सुरु; काय करावे अन् काय करु नये?
तपोवनात साधुग्राम उभारण्याबाबत जमीन मालक शेतकऱ्यांसाठी काही फॉर्म्युला ठरलेला आहे. त्याला मूर्त स्वरूप अद्याप दिलेले नाही. मात्र तत्पूर्वी दोन ते तीन वेळेस शेतकऱ्याशी प्रशासनाने चर्चा करून काही तोडगे सुचविलेले आहेत. आता १७ ते १९ या दरम्यान शेतकऱ्याच्या बैठका बोलविण्यात आल्या आहेत. त्यासाठी सुमारे १८० शेतकऱ्यांना बोलविण्यात आले आहे. त्यांच्या याबाबत काय लेखी सूचना आहेत, म्हणणे आहे ते समजावून घेवू, त्यांना मोबदला टीडीआरमध्ये हवा की रोख हवा याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल. त्यासाठी शासनाशी देखील चर्चा सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.






