भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७५ वा वाढदिवस साजरा केला जात आहे. मोदींच्या राजकीय बाजूबद्दल आपल्याला बरंच काही ठाऊक आहे पण त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडीबाबत मात्र अनेकांना फारशी माहिती नाही. अशात आज आम्ही तुम्हाला नरेंद्र मोंदींच्या आवडीच्या चित्रपटाची माहिती देत आहोत ज्याने एकेकाळी बाॅक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. जम्मू, काश्मीर, लडाख आणि सिक्कीमच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी मुलांशी संवाद साधला. यात त्यांच्या आवडीच्या चित्रपटाविषयी विचारताच त्यांनी उत्तरात देव आनंदच्या 'गाईड' चित्रपटाचे नाव सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फेव्हरेट चित्रपट माहिती आहे का? 60 वर्षांपूर्वी झाला होता रिलीज, जिकलेत 7 फिल्मफेअर अवार्ड्स
देव आनंद यांचा 'गाईड' चित्रपट १९६५ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
राजू, एक फ्री-लान्स टूर गाईड, आणि रोझी, एका श्रीमंत पुरातत्वशास्त्रज्ञाची दडपलेली पत्नी, यांच्यातील प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
चित्रपटात देव आनंद आणि वहिदा रेहमान यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.
चित्रपटाची कथाच नाही तर यातील गाणी देखील खूप फेमस झाली. लोकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला, ज्यामुळे बाॅक्स ऑफिसवर त्याने छप्परफाड कमाई केली.
चित्रपटाने 7 फिल्मफेअर अवार्ड्स जिंकले असून आजही चित्रपटातील देव आनंद आणि वहिदा रहमान यांचा अभिनय सर्वोत्तम मानला जातो.