पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' फळांचे सेवन
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी यांसारख्या बेरीचे सेवन करू नये. या फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचू शकते. बेरिजमध्ये जास्त पाणी असते, त्यामुळे या फळांवर लवकर बॅक्टेरिया वाढू लागतात. तसेच अन्नपदार्थांमधून विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कलिंगड मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. कलिंगडमध्ये असलेल्या पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कलिंगड लवकर खराब होण्याची शक्यता असते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चुकूनही आंब्याचे सेवन करू नये. आंब्याचे सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे पोटात जडपणा, गॅस आणि अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
पीचमध्ये असलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे हे फळ अतिशय मऊ होऊन लवकर खराब होऊन जाते. तसेच या फळाला सहज बुरशी येण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पीच खाऊ नये.
काकडीमध्ये भरपूर पाणी असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर पाणी असलेल्या फळांचे किंवा भाज्यांचे अजिबात सेवन करू नये. यामुळे शरीराला हनी पोहचण्याची शक्यता असते.