रात्रीच्या जेवणाआधी चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
पालकमध्ये लोह, कॅल्शियम आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. पण रात्रीच्या वेळी पालक खाणे टाळावे. पालकमध्ये ऑक्सॅलेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे किडनी स्टोन किंवा किडनीसंबंधित समस्या उद्भवू शकतात.
रात्रीच्या वेळी फळांचा रस अजिबात पिऊ नये. फळांच्या रसाचे सेवन केल्यामुळे पचनाची समस्या उद्भवू लागते. तसेच रात्रीच्या वेळी फळांचा रस प्यायल्यामुळे रक्तात साखरेची पातळी वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
काकडी आणि बीटमध्ये भरपूर पाणी असते. यामुळे डिहायड्रेशनची समस्या दूर होते. पण रात्रीच्या वेळी काकडी किंवा बीटचे सेवन केल्यास वारंवार लघवीला जावे लागेल. बीटमध्ये नायट्रेट्स आढळून येतात, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते.
जेवणाआधी किंवा उपाशी पोटी मोड आलेली कडधान्य खाऊ नये. यामुळे शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. मोड आलेली कडधान्य खाल्यामुळे गॅस, पोटफुगी आणि अपचन होऊ शकते.
जेवणाआधी चुकूनही चहा किंवा कॉफी पिऊ नये. चहा कॉफीच्या सेवनामुळे भूक कमी होऊन जाते. यामुळे छातीमध्ये जळजळ किंवा ऍसिडिटी होऊ शकते.