रात्री झोपण्याआधी आपल्यातील अनेकांना कायमच दूध पिण्याची सवय असते. दूध हळद, साखर किंवा केशर काड्या टाकून सेवन केले जाते. रात्री झोपण्याआधी नियमित हळदीचे दूध प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. आयुर्वेदामध्ये सुद्धा हळदीच्या दुधाला विशेष महत्व आहे. हळद आणि दुधाचे कॉम्बिनेशन चांगल्या झोपेसाठी फायदेशीर मानले जाते. हळदीतील करक्यूमिन आणि दूधातील अमिनो एसिड्स एकत्र करून प्यायल्यास झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते. चला तर जाणून घेऊया हळदीचे दूध पिण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल, पचनक्रिया राहील निरोगी

हळदीचे दूध प्यायल्यामुळे लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत होते. लिव्हरवर जमा झालेली अनावश्यक चरबी नष्ट करण्यासाठी रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध प्यावे. यामुळे शरीराची पचनक्रिया सुद्धा चांगली राहते.

हळदीच्या दूधामध्ये असलेले अँटीइंफ्लामेटरी गुणधर्म हाडांमधील स्टिफनेस दूर करतात आणि स्नायू मजबूत करण्यास मदत करतातय त्यामुळे नियमित एक ग्लासभर हळदीचे दूध प्यावे.

हळदीचे दूध बनवताना सर्वप्रथम दूध उकळवण्यासाठी ठेवा,त्यानंतर दूधाला एक उकळी आल्यानंतर त्यात हळद घालून मिक्स कर. रात्री झोपण्याचा अर्धातास आधी हळदीचे दूध प्यावे.

हळदीचे दूध प्यायल्यामुळे झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि शांत झोप लागेल. याशिवाय पचनक्रिया सुद्धा निरोगी राहण्यास मदत होईल.

मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज कमी करण्यासाठी हळदीचे दूध प्यावे. हळदीतील करक्यूमिन ताण-तणाव कमी करुन मेंदू शांत करण्यास मदत करते.






