सकाळी उठल्यानंतर अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा, कॉफी, ग्रीन टी किंवा इतर पेयाने होते. मात्र नेहमी नेहमी अतिप्रमाणात ग्रीन टी चे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. काहींना दिवसभरातून पाच ते सहा वेळा ग्रीन टी प्यावी लागते. मात्र अतिप्रमाणात ग्रीन टी चे अतिसेवन आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जास्त प्रमाणात ग्रीन टी चे सेवन केल्यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
ग्रीन टी चे अतिसेवन आरोग्यासाठी ठरेल घातक

दैनंदिन आहारात अतिप्रमाणात ग्रीन टी चे सेवन केल्यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. कारण यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेवर खाज किंवा एलर्जी उठू शकते.

ग्रीन टी चे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे ऍसिडिटी, गॅस आणि पोटदुखी इत्यादी पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दिवसभरात एक ते दोन वेळा ग्रीन टी चे सेवन करावे.

ग्रीन टी मध्ये कॅटेचिनचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीरातील विटामिनची पातळी कमी होते. ग्रीन टी च्या अतिसेवनामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते.

हृद्य आणि रक्तवाहिन्यांसंबंधित समस्या असलेल्या लोकांनी आहारात ग्रीन टी चे सेवन करू नये. यामुळे उच्चरक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.

ग्रीन टी च्या सेवनामुळे निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे दैनंदिन आहारात कमीत कमी ग्रीन टी चे सेवन करावे.






