सातारा नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीमध्ये होत आहे. यावेळी सातारा नगरपालिकेमध्ये खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे यांनी मनोमिलन करत भाजपच्या चिन्हावर आपले उमेदवार उभे केले आहेत यामुळे दोन्ही राजेंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची तारांबळ झाली आहे. अनेक प्रभागात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्याने दोन्ही महाराजांची चिंता वाढली आहे. 75 अपक्ष उमेदवारांना शांत करण्यात दोन्ही राजेंना यश आले असले तरी 35 अपक्ष उमेदवारांनी खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे फोटो लावून आपला प्रचार सुरू केला आहे.त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवारांची गोची झाली असल्याने त्यांना अडचणी येऊ लागले आहेत. यावर मंत्री शिवेंद्रराजे यांनी अपक्ष उमेदवारांना इशारा देत बॅनर वरचे फोटो काढावेत अन्यथा निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येईल असा इशारा दिला आहे. भाजपचे उमेदवार हेच दोन्ही राजेंकडून अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितल आहे महाविकास आघाडीला देखील नाराज झालेल्या भाजपच्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदासाठी उभे करावे लागले हे मोठे दुर्दैव असल्याची यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.