सुषमा अंधारे यांच्या दिल्लीतील भेटीमुळे ठाणे राजकारणात उत्सुकता वाढली आहे. या भेटीवरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सस्पेन्स वाढवणारे वक्तव्य केले. “मला सर्वच पक्षांचे लोक भेटायला येतात. त्या भेटीतील चर्चेची माहिती आत्ता सांगणं योग्य नाही; योग्य वेळ आली की सविस्तर बोलेन”, असे म्हस्के यांनी सांगत या भेटीचा राजकीय संदर्भ अधिकच गूढ बनवला. वाशी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे विधान केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.