लग्न म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस. यादिवशी छान नटून थटून मेकअप करून नव्या नवरीच्या लुकमध्ये मुली तयार होतात. लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच लग्नाची तयार केली जाते. लग्नातील साड्या, शालू, लेहेंगा, हळदीची साडी इत्यादी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी सुंदर सुंदर साड्या घेतल्या जातात. मात्र लग्न झाल्यानंतर सासरच्या घरी नेमकी कोणत्या पार्टनमधील साडी नेसावी? असे अनेक प्रश्न मुलींना सतत पडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लग्नानंतर नेसण्यासाठी काही सुंदर साड्या सांगणार आहोत. या साड्या कोणत्याही कार्यक्रमात शाही लुक देतील. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नानंतर नव्या नवरीसाठी 'या' प्रकारच्या साड्या आहेत सर्वोत्तम
जगभरात प्रसिद्ध असलेली कांजीवरम सिल्क साडी अंगावर अतिशय चापून चोपून बसते. काहींना साडी नेसायला येत नाही. त्यामुळे हलकी फुलकी साडी नेसायची असल्यास तुम्ही कांजीवरम सिल्क साडी नेसू शकता.
भारतातील अतिशय रॉयल लुक देणाऱ्या साड्यांमध्ये बनारसी साडीचा सुद्धा समावेश आहे. लग्नानंतर घरातील पूजा किंवा इतर शुभ कार्यांसाठी तुम्ही बनारसी साडी नेसू शकता.
सासरी गेल्यानंतर पहिल्याच दिवशी सुंदर दिसायचे असेल तर तुम्ही मिरर वर्क पॉली जॉर्जेट साडी नेसू शकता. ही साडी अतिशय हेवी आणि रिच लुक देते. साडीमध्ये एथनिक मोटिफ्स आणि मिरर वर्क करून नक्षीकाम केले जातात.
महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळखली जाणारी पैठणी साडी सर्वच महिलांना खूप जास्त आवडते. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या दिवशी तुम्ही मोराचे नक्षीकाम करून विणण्यात आलेली किंवा सोन्याची जर असलेली पैठणी साडी नेसू शकता.
ऑरगेंझा साडी नेसण्यास अतिशय सोपी आहे. या फॅब्रिक अतिशय मऊ असल्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात किंवा सणाच्या दिवशी तुम्ही ऑरगेंझा साडी नेसू शकता.