वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले या गावी अनोख्या पद्धतीने नवरात्री उत्सव साजरा केला जातो. गेल्या २५ वर्षांपासून चक्क 20 फूट खोल असलेल्या तलावात मध्यभागी देवीची स्थापना केली जाते. देवीच्या दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी यावेळी दिसून आली.एवढेच नाही तर तलावात तसेच या मंदिराभोवती आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. देवीच्या मंडपापर्यंत जाण्यासाठी लाकूड आणि प्लास्टिकच्या ड्रमने तयार केलेल्या एका बोटीच्या साहाय्याने भक्तांना आत घेऊन जातात. विसर्जनाच्या वेळी गावात देवीची मिरवणूक काढून पुन्हा याच तलावात विसर्जन केले जाते.