बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा वयाच्या सत्तरीतसुद्धा लोकांना प्रेमात पडताना दिसत आहे. अभिनेत्रीचे नेहमीच नवनवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. आता अश्यातच सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने दशकातील अभिनेत्री रेखाजींचे काही सुंदर फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीचा लुक नेहमीसारखाच आकर्षित आणि मोहक दिसत आहे. तसेच रेखाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्याला चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.
रेखाच्या रुबाबदार लुकने वेधले लक्ष, पाहा PHOTOS (फोटो सौजन्य - Instagram)
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये रेखा यांनी गुलाबी रंगाची सिमर साडी नेसली आहे. साडीच्या किनाऱ्यावर सुंदर सोनेरी नक्षीकाम केले आहे.
रेखा या गुलाबी साडीवर खूपच मोहक दिसत आहे. तसेच त्यांनी साडीवरील पारंपरिक लुक पूर्ण करण्यासाठी हातात मोठ्या गोल्डन बांगड्या, कानात मोठे झुमके, आणि केसाच्या भांगेत लाल सिंदूर लावले आहे.
रेखा यांनी या साडीवर एक गॉगल देखील लावला आहे. ज्यामुळे त्यांचा लुक एकदम रुबाबदार दिसत आहे. तसेच त्यांनी हातात एक सोनेरी बटवा देखील पकडला आहे.
अभिनेत्रीने या सुंदर साडीवर वेगवेगळ्या पोज देऊन फोटोशूट केले आहे. जे फोटो खूपच सुंदर दिसत आहे. त्यांच्याकडे पाहून कोणीच म्हणणार नाही की ही दशकातील अभिनेत्री आहे.
तसेच आता अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक या फोटोला भरभरून कंमेंट करत आहेत आणि रेखा यांचे कौतुक करत आहेत.