फोटो सौजन्य - Social Media
प्रेमात पडला आहात? नुकतेच नात्यात अडकला आहात किंवा लग्न झालंय. आपल्या प्रेयसीला कसे खुश ठेवावे? हा प्रश्न प्रत्येक प्रियकराला पडतो. जर तुम्हाला पडला असेल तर टेन्शन नॉट! या बातमीत तुमच्या प्रश्नांचे निवारण 100% होणार आहे, याची खात्री आहे. हे टिप्स फॉलो कराल तर प्रियसीला भविष्यात बायको म्हणून मिळवाल पण यातला एक तरी मुद्दा कमी पडला तर भावी संसाराचा आताच खेळखोळंबा होईल. त्यामुळे वाचताना जरा नीट आणि लक्ष देऊन वाचाल.
मुलींना प्रेमात प्रियकराकडून विश्वास हवा असतो. पारदर्शकता हवी असते. ती पुरवण्यात कसलाही संकोच करू नका. यामध्ये उशीर करू नका. प्रत्येक वेळात तिचे मन आणि त्या मऊसर मनाचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा. तिच्याशी नेहमी खरं वागा. आपल्याला कामे आहेत. आपल्याला मित्र आहेत पण यामध्ये तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. ती जर तुमच्याशी खरी आहे तर तीही तुमच्या भविष्यातील कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे तिला वेळ द्या. तिला समजून घ्या. ती तुमची वाट पाहत असते. मुळात, मुली मुलांकडून अपेक्षा ठेवतात. जरी कधी म्हणत नसली तरी तिला तुम्ही हवे आहात आणि तुम्ही तिच्यासाठी नेहमी तत्पर रहा.
प्रेमात पडलेली मुलगी आई होते. आपल्या आईइतकीच ती आपली विचारपूस करेल. आपल्यासाठी नेहमी तत्पर असेल. तिच्या लहानसहान सवयी लक्षात ठेवा. तिच्या आवडीनिवडी जपा. ती तुमच्यासाठी किती स्पेशल आहे. याची नेहमी तिला जाणीव करून द्या. तिला बरेच स्वप्न आहेत. त्या स्वप्नांसाठी तिच्या मागे खंबीर उभे राहा. एखादा प्रियकर असणे किंवा प्रेयसी असणे, ज्याची भावना खरी आहे तो व्यक्ती आपल्यामागे वेळेनुसार आपली आई, आपला बाप, आपला भाऊ तर आपला मित्र म्हणून उभा राहतो.
जर तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून या सगळ्या नात्यांची भावना मिळत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात जिंकला आहात आणि या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून कधीच दूर होऊन नका देऊ. तुमच्या प्रेयसीला सरप्राईज द्या. तिला आनंदित ठेवा. तुमच्याकडून आलेले लहानसहान गिफ्ट्स तिच्यासाठी फार मोलाचे आहेत. तिच्या शब्दांचा मान राखा. जरी ती कधी चुकत असली तरी तिला समजावून सांगा की ‘बाळ, तू चुकतेस!’ थोड्या रागवेल ती! पण पुन्हा ती तुमच्यापासून दूर कधीच जाणार नाही. यालाच प्रेम म्हणतात.