आपली स्वतःची कार असणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. यातही अनेक जण SUV कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असतात. जर तुम्ही सुद्धा अशाच एका मिड साइझ एसयूव्हीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी Toyota Urban Cruiser Hyryder चा बेस व्हेरिएंट एकदम परफेक्ट कार असेल.
टोयोटा भारतीय ऑटो बाजारात मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये Toyota Urban Cruiser Hyryder ऑफर करते. कंपनी याचा बेस व्हेरिएंट म्हणून ई व्हेरिएंट ऑफर करते. जर तुम्ही या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 2 लाखांच्या डाउन पेमेंटसह कार घरी आणू इच्छित असाल, तर याचा मासिक ईएमआय किती असेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
सगळं लक्ष ‘या’ Hybrid SUV वरच! लवकरच बाजारात होणार लाँच, किंमत…
Urban Cruiser Hyryder चा बेस व्हेरिएंट म्हणून ई व्हेरिएंट ऑफर केला जातो. ही कार भारतीय बाजारात 10.94 लाख या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली तर तुम्हाला आरटीओसाठी अंदाजे 1.10 लाख, इंश्युरन्ससाठी अंदाजे 53000 आणि टीसीएससाठी 11000 द्यावे लागतील. यामुळे Toyota Urban Cruiser Hyryder E on road price अंदाजे 12.68 लाख रुपये होईल.
जर तुम्ही ही कारचा बेस व्हेरिएंट E खरेदी करत असाल, तर बँक केवळ एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा वेळी तुम्ही 2 लाख रुपयांची डाउन पेमेंट भरल्यानंतर सुमारे 10.68 लाख रुपये बँकेतून फायनान्स करावे लागतील. बँकेकडून जर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी हा कर्ज दिला गेला, तर पुढील सात वर्षांसाठी तुम्हाला दर महिन्याला सुमारे 15650 इतका EMI भरावा लागेल.
जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 10.68 लाख रुपयांचे लोन घेतले, तर सात वर्षांपर्यंत तुम्हाला दरमहा 15650 रुपये भरावे लागेल. अशा रीतीने सात वर्षांत तुम्ही केवळ व्याज म्हणून सुमारे 4.34 लाख रुपये भराल. म्हणजेच, एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज धरून तुमच्या या SUV ची एकूण किंमत सुमारे 17.02 लाख इतकी जाईल.
वाह काय ऑफर आहे! ‘या’ कंपनीचे Electric Scooter आता फक्त 50,000 रुपयात घरी आणता येणार
टोयोटाने अर्बन क्रूझर हायरायडर SUV मिड-साइज SUV सेगमेंट मध्ये उतरवली आहे. या सेगमेंटमध्ये या कारची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, Honda Elevate, Tata Harrier, Volkswagen Taigun
SUV सोबत होते.