IRCTC Thailand package : थायलंड टूर स्वस्तात! आयआरसीटीसीचे भन्नाट पॅकेज; ४ दिवसांत मज्जा फक्त ₹४९,५०० मध्ये ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
आयआरसीटीसीचे थायलंडसाठी खास ४ दिवस, ३ रात्रींचे ऑल-इन-वन टूर पॅकेज फक्त ₹४९,५०० मध्ये उपलब्ध.
या पॅकेजमध्ये फ्लाइट, हॉटेल, जेवण, पर्यटनाची सुविधा सर्व काही समाविष्ट.
१ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत बँकॉक आणि पटायाचा शानदार प्रवास करता येणार.
IRCTC Thailand package : विदेश प्रवास म्हटला की बहुतेकांना पहिल्यांदा आठवतो तो थायलंड( Thailand) . सुंदर समुद्रकिनारे, रंगीबेरंगी नाईटलाइफ, शॉपिंग, आयलंड टूर आणि तिथलं वेगळंच आकर्षण हे सगळं अनुभवण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करतात. पण, जर तुम्हाला ही सारी मजा अगदी परवडणाऱ्या किंमतीत घ्यायची असेल, तर आयआरसीटीसी( IRCTC) ने तुमच्यासाठी एक जबरदस्त टूर पॅकेज तयार केलं आहे.
भारतीय रेल्वेची पर्यटन शाखा म्हणजेच आयआरसीटीसी (IRCTC) अधूनमधून अशा परदेश टूर पॅकेजेस आणते, ज्यामध्ये प्रवाशांचा खर्च कमी होतो आणि सुखसोयी मात्र अगदी टॉप क्लास मिळतात. यावेळीही त्यांनी एक शानदार थायलंड पॅकेज आणलं आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?
४ दिवस, ३ रात्रींच्या या टूर पॅकेजमध्ये खालील सुविधा मिळतील:
चेन्नईहून बँकॉकपर्यंत थेट फ्लाइट
बँकॉक आणि पटायामध्ये आलिशान हॉटेलमध्ये राहण्याची सोय
ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर सर्व समाविष्ट
पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी टूर गाईड आणि ट्रान्सपोर्टेशन
परतीची फ्लाइट तिकीट
हे सगळं एकत्र मिळून फक्त ₹४९,५०० मध्ये!
भेट देण्याची ठिकाणं: बँकॉक आणि पटाया
प्रवास कालावधी: १ ऑक्टोबर २०२५ ते ४ ऑक्टोबर २०२५
फ्लाइट: चेन्नईहून थेट बँकॉकला
किंमत: ₹४९,५०० (ग्रुप बुकिंगमध्ये किंमत कमी होईल, सोलो बुकिंग ₹५६,५००)
थायलंड हे नेहमीच भारतीयांसाठी सर्वात जास्त पसंतीचं ठिकाण राहिलं आहे.
पटायाचे बीचेस आणि वॉटर स्पोर्ट्स
बँकॉकची शॉपिंग मार्केट्स आणि नाईटलाइफ
स्वादिष्ट थाई फूड
आणि तिथलं शांत, रिलॅक्सिंग वातावरण
या सगळ्या गोष्टींमुळे थायलंड प्रत्येकाच्या बकेटलिस्टवर असतं.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IRCTC Tour Package: केरळच्या मोहक प्रवासाची सुवर्णसंधी; जाणून घ्या IRCTC चे ‘लक्झ एस्केप’ पॅकेज
जर तुम्हालाही या स्वप्नवत थायलंड ट्रिपला जायचं असेल, तर बुकिंग अगदी सोपं आहे.
IRCTC Tourism च्या अधिकृत वेबसाइटवर (irctc.tourism.com) जा.
तुमचं पॅकेज निवडा आणि पेमेंट करा.
अधिक माहितीसाठी किंवा ऑफलाइन बुकिंगसाठी तुम्ही ९००३१४०६८२ / ८२८७९३१९७४ या क्रमांकांवर संपर्क करू शकता.
आजकाल परदेश प्रवासासाठी प्रचंड खर्च येतो. पण IRCTC मुळे प्रवाशांना कमी बजेटमध्ये आलिशान टूरचा अनुभव घेता येतो. त्यामुळे विद्यार्थी, कुटुंबं, मित्रमंडळी – सगळ्यांसाठीच हे पॅकेज उत्तम आहे. आयआरसीटीसीचं थायलंड पॅकेज हे कमी खर्चात जास्त मजा देणारं आहे. ४ दिवसांत बँकॉक आणि पटायाचे अनुभव, हॉटेल-फ्लाइट-जेवण सर्व समाविष्ट, आणि बजेट फक्त ₹४९,५००.